वैजापूर ता,२८
येथील पालिकेच्या वैजीनाथ वाचनालयातील वाचक वर्गाच्या वतीने बुधवार (ता,२८)रोजी स्वातंत्र्यवीरांचे कुलपुरुष विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रथम जेष्ठ वाचक बबनराव करमासे,व आय .जे.शिंपी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग विशद केले.या प्रसंगी वाचक बबनराव क्षीरसागर, केशव क्षीरसागर,लक्ष्मण राऊत,विजय पडवळ,संजय राजपूत,के.बी.जेजुरकर, भरत वैद्य यांनी व वाचकांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.ग्रंथपाल
सहाय्यक एस. व्ही.राजपूत यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांना अभिवादन करतांना वाचनालयातील उपस्थित जेष्ठ वाचक वर्ग)
No comments:
Post a Comment