नागमठाण ता. वैजापूर-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध प्रकारच्या उपाय योजना योजिल्या आहेत याचाच एक भाग म्हणून स्वस्त धान्य दुकानात शासनाने प्रति माणूस5किलो तांदूळ मोफत दिले आहे
गुरुवार दि. २३/०४/२०२० रोजी- कोरोनाच्या संकटात देशातील गरीब जनतेसाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून नागमठाण येथील रेशन दुकानदार पवन चांगदेव चव्हाण यांच्या दुकानात सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून मोफत तांदूळ वाटप शासनाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याचे आमदार_रमेश बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संभाजीनगर जिल्हा परीषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती
अविनाश पाटील गलांडे, माजी पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब जगताप, तलाठी महेंद्र गायकवाड, पोलीस पाटील राजेंद्र पाटील तांबे, नागेश्वर सेवा समितीचे अध्यक्ष श्री. बद्रिआण्णा चव्हाण, माजी चेअरमन भीमाशंकर पाटील तांबे, प्रविण चव्हाण, सागर पाटील चोभे, नारायणराव विखे, विठ्ठल साबदे, नारायण तांबे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment