याच प्रसंगी vaijapur news च्या टीमला काही व्यक्ती गरजूंना मदत करताना आढळुन आले असता मदत करण्यासाठी आलेल्या व्यक्ती ने हात जोडून नम्रपणे आम्हाला सांगितले "प्लिज आमचे फोटो काढू नका, आम्हाला प्रसिद्धी देऊ नका" खरंच या प्रसंगी vaijapur news ने आशाप्रकारे मदत करणाऱ्या वैजापूरतील नागरिकांना सलाम केला. आपण जर अशा प्रकारे मदतीची भावना ठेवून काम केले व शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले तर आपण सहज कोरोना विरूद्ध लढाई जिंकणारच.
वैजापूर- प्रतिनिधी ,कोरोना आपला विळखा दिवसेंदिवस वाढवत आहे. संपूर्ण विश्व कोरोना मुळे त्रस्त झाले आहे त्यात आपला देश पण वंचित नाही. संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे, सर्व आर्थिक उलाढाली पूर्ण पणे ठप्प आहे. कित्येक मजूर बेरोजगार झाले आहे, खिशात पैसा नाही, काम धंदा नाही, परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. प्रत्येक कामगार समोर पोट भरण्याचा प्रश्न अक्राळ विक्राळ स्वरूपात उभा आहे. कशीही परिस्थिती असली तरी शरीराला अन्न पाणी लागते, भूख, तहान भागवल्या शिवाय पर्याय नसतो. हीच परिस्थिती वैजापूर मध्ये बघावयास मिळत आहे, त्या लोकांना कोरोना पेक्षा जास्त चिंता आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ही आहे. ह्या तहानलेल्या, भुकेल्या लोकांसाठी वैजापूरतील काही व्यक्ती, संघटना आपापल्या पद्धतीने या लोकांची मदत करताना दिसत आहे. गरीब गरजूंना कुणी आपल्या घरून जेवणाचा डबा आणून देत आहे, तर कुणी पाणी देतंय तर कुणी ऊन पासून संरक्षण होण्यासाठी चप्पल देत आहे.
No comments:
Post a Comment