वैजापूर/
शहरातील व तालुक्यातील कोरोना संदर्भातील माहिती
व पूर्व तयारी तसेच शहरालगत असलेल्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सीमा चेक पोस्ट बाबत माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
सोमवार(ता,२०)रोजी भेट देऊन सर्व माहिती जाणून
घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या त्यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली ,येथील ट्रामा केअर सेंटर इमारत ची माहिती घेतली वेळकाळ समयी प्रसंग उदभवल्यास या इमारतीत रुग्ण व्यवस्था
करण्यात येईल का?या विषयी उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ,गजानन टारपे यांच्या शी चर्चा केली ,तसेच त्यांना आरोग्य सेवा बाबत अधिक लक्ष
देऊन सर्व सुविधा रुग्णांना मिळाव्या या विषयी सूचना केली ,उप जिल्हा रुग्णालयास जे साहित्य आवश्यक आहे त्याची मागणी तात्काळ करा ते उपलब्ध करून द्या असा आदेश त्यांनी सोबत आलेल्या संबंधित
अधिकाऱ्यांना दिला,त्यांनंतर त्यांनी शिवराई रस्त्यावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथील खोल्याची पाहणी केली जर कोरोना परिस्थिती उदभवली तर रुग्ण व्यवस्थे साठी जागा ची पाहणी केली तदनंतर नाशिक जिल्हा सीमा येवला चेक पोस्ट व अहमदनगर
सीमा सुराला चेक पोस्ट येथे ही भेटी देऊन पाहणी केली व तेथील अधिकारी वर्गाला प्रवेश बंदी बाबत कडक पालन करण्याचे आदेश दिले,शहरातील व तालुक्यातील "कोरोना" स्थिती व ते हाताळत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले, कोरोना शिरकाव वैजापूर मध्ये होऊ नये म्हणून
सर्वांनी दक्ष राहून काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या या समयी आ.रमेश बोरणारे,डॉ.दिनेश परदेशी,उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप,
उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रंजनकर,तहसीलदार महेंद्र गिरगे, गट विकास अधिकारी अजयसिंह पवार, मुख्याधिकारी विठ्ठल डाके,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,तालुका आरोग्य अधिकारी जी.एस. इंदूरकर ,तसेच राजेंद्र साळुंके,लक्ष्मीकांत दुबे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment