वैजापूर तालुक्याला मिळणार 106 कोटी रुपयांची भरपाई - Vaijapur News

Breaking

Monday, October 18, 2021

वैजापूर तालुक्याला मिळणार 106 कोटी रुपयांची भरपाई

वैजापूर तालुक्याला मिळणार 106 कोटी रुपयांची भरपाई                                                          सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वैजापूर तालुक्यात झालेले आहे. राज्य सरकारच्या पॅकेज नुसार तालुक्यातील  शेतकऱ्यांना 106 कोटी 24 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे .पालक मंत्री सुभाष देसाई यांनी गेल्या आठवड्यात वैजापूर तालुक्यातील बाधित गावांना भेटी देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती ,बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या, तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून सरकारकडे पाठपुरावा केला. तालुक्यातील एक लाख चार हजार 816 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे या निर्णयानुसार वैजापूर तालुक्यातील  शेतकऱ्यांना सुमारे 106 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे यामध्ये जिरायती साठी दहा हजार रुपये बागायतीसाठी पंधरा हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर अर्थसाह्य देण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment