"ईद-ए-मिलाद-ऊन- नबी उत्साहात साजरा - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 19, 2021

"ईद-ए-मिलाद-ऊन- नबी उत्साहात साजरा

वैजापूर ता,१९
शहरातील मुस्लिम बांधवांनी मंगळवार(ता,१९)रोजी
कोरोना महामारीचे सर्व  नियम पाळत "ईद-ए-मिलाद-ऊन- नबी उत्सव उत्साहात साजरा केला, कोणतीही 
मिरवणूक काढली नाही ,किंवा गर्दी केली नाही,व सुरक्षित अंतर पाळत ईद-मिलाद-साजरी केली,शहरातील ईदगाह मैदानावर आयोजित कार्यक्रमात  महंमद पैगंबर यांच्या जीवन प्रणाली व स्थापन केलेल्या धर्मप्रणालीवर आवेज रजा(हैद्राबाद)यांनी प्रकाश टाकला,याप्रसंगी उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली, या प्रसंगी आ,रमेश पा,बोरनारे, उपनगराध्यक्ष,डॉ,परदेशी , नगरसेवक इमरान कुरेशी, रियाज अकील शेख,  काँग्रेस शहर अध्यक्ष काझी मलिक,प,स,चे माजी सभापती बाबासाहेब जगताप,महेश बुणगे, सदर ए,काझी हाफीजोद्दीन, अकिल शेठ,मजीद कुरेशी, बिलाल सौदागर,हमीद शेठ,अल्ताफ बाबा,हिकमत काका,गयास मामु,कय्युम
     
सौदागर,ठा,धोंडिरामसिंह राजपूत यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-ऊन-नबीच्या शुभेच्छा दिल्या, सय्यद जुबेरोद्दीन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,(फोटो -जुमा मजीद बाहेर मुस्लिम बांधवांना ईद-मिलाद-ऊन-नबी मुबारक देताना धोंडिरामसिंह राजपूत,सदर ए काझी हाफीजुद्दीन,काँग्रेस शहंर अध्यक्ष काझी मलिक,मो,गयास मामु व ईतर)

No comments:

Post a Comment