आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, - Vaijapur News

Breaking

Sunday, October 24, 2021

आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद,

*औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 14 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 118 रुग्णांवर उपचार सुरू* 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (मनपा 06, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 347 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 72 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 607 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 118 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 
*शहर रुग्ण संख्या (02)*

मारोती नगर, मयूर पार्क (01), अन्य (01)

*ग्रामीण भाग रुग्ण संख्या (18)*

गंगापूर (14), वैजापूर (03), पैठण (01)

*मृत्यू (03)*

*घाटी (02)*

1. 70, स्त्री, बालाजी नगर, औरंगाबाद
2. 80, स्त्री, कृष्णा नगर, औरंगाबाद

*खासगी (01)*

1. 46, पुरूष, आपेगाव-पैठण

No comments:

Post a Comment