श्री स्वामी समर्थ विद्यालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 12, 2021

श्री स्वामी समर्थ विद्यालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू

वैजापूर ता१२
शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण व्हावे म्हणून  शहरातील विविध प्रभागात
येथील उपजिल्हा रुग्णालयाने लसीकरण केंद्र उघडून
जेष्ठ नागरिक,दिव्यांग व महिलांना कोविड लस घेण्याची सुविधा उपल्बध करून दिली आहे,उपजिल्हा
रुग्णालय अधीक्षक डॉ,गजानन टारपे,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र, सहा,सात,व आठ साठी
या प्रभागातील श्री स्वामी समर्थ विद्यालयात मंगळवार(ता,१२)रोजी  कोविड लसीकरण केंद्र सुरू करून वरील प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकाना 
लाभ मिळवून दिला आहे,या केंद्रावर सकाळपासून गर्दी दिसून आली ,जिल्हा आरोग्य समिती सदस्य
धोंडिरामसिंह राजपूत यांनी या केंद्राला भेट देऊन कोविड -लसीकरण आरंभ केले,शहरात आणखी विविध शाळेच्या  प्रांगणात कोविड लसीकरण  आरंभ
झालेले आहेत,शहरातील नागरिकांनी घराजवळील या  लसीकरण  केंद्रात जाऊन लस घ्यावीअसें आवाहन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले,याप्रसंगी
शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र साळुंके,शिवसेना महिला
आघाडी प्रमुख सुलभा भोपळे,दिपकराव साळुंके,
मुख्यध्यापक आर,डी,वसावे,शिक्षक एस, आर,शेलार,
आर,आर,घुसळे, उपजिल्हारुग्णालय नर्सेस उर्मिला
गायकवाड,निकिता पवार,तुषार साबळे, सहभाग नोंदवीत होते,शहराच्या इतर केंद्रवरही कोविड-लसीकरनाला उत्तम प्रतिसाद मिळालेला  आहे,(फोटो
कॅप्शन-लसीकरण करताना नर्स उर्मिला गायकवाड, सुलभा भोपळे,धोंडिरामसिंह राजपूत, दीपक साळुंके व ईतर)

No comments:

Post a Comment