घोषणा दिनी विविध कार्यक्रम आयोजित करून डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 13, 2021

घोषणा दिनी विविध कार्यक्रम आयोजित करून डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वैजापूर ता,१३
येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली धर्मांतर घोषणा दिली या  दिनानिमित्त वैजापूर शहरात बुधवार(ता,१३)रोजी विविध कार्यक्रम आयोजित करून डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,आरंभी सकाळी दहा वाजता डॉ,बाबासाहेब यांच्या पुतळ्या जवळ शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक एकत्र जमून त्यांनी डॉ,आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, या वेळी उपनगराध्यक्ष साबेरखान,माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, जि.प.सदस्य पंकज ठोंबरे,नगरसेवक दशरथ बनकर,दिनेश राजपूत,राजेश गायकवाड,काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ,धोंडिरामसिंह राजपूत,जयप्रकाश बोरगे,बी. एस. त्रिभुवन,सुनील त्रिभुवन,ज्ञानेश्वर सिरसाट, शिक्षणाधिकारी एम.आर.गणवीर , शिवलिंग साखरे,राजू पठाण ,  बजरंग मगर,चंद्रसेन भोसले,ताराचंद त्रिभुवन इंजिनीयर विशाल साळूखे,,यांनी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले , 
बौद्धचार्य के. आर. पडवळ गुरूजी यांनी वंदना सादर केली, पत्रकार सुनील त्रिभुवन यांनी सूत्र संचलन केले तर धोंडिरामसिंह राजपूत यांनी आभार मानले.

 ■ युवा लहुजी भीम प्रतिष्ठाण च्या वतीने फळ वाटप

या वेळी युवा लहुजी भीम प्रतिष्ठाण च्या वतीने  मुक्तीभूमी येवला  येथे जाणाऱ्या भीम अनुयायांना  फळ वाटप करण्यात आले   या वेळी वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती, डॉ दिनेश परदेशी, साबेर भाई ,उल्हास भाऊ  ठोंबरे, नगरसेवक बबन त्रिभुवन,राजेश गायकवाड, दशरथ बनकर,दिनेश राजपूत, प्रमोद पठारे,लक्ष्मण धनेश्वर यशवंत पडवळ, बाबासाहेब वाघ,राजेंद्र बागुल,बाळासाहेब गायकवाड, बी एस त्रिभुवन, विलास पगारे,हेड कॉन्स्टेबल संजय घुगे, युवा लहुजी भीम सेनेचे साहेबराव पडवळ,विलास म्हस्के, भाई शिवा थोरात, बिंटी भाऊ साठे,रुदा शेजवळ,,सोमनाथ गायकवाड, विशाल त्रिभुवन,सागर मोटे, जाकीर पठाण, प्रवीण शिंदे, मेघराज त्रिभुवन,मोबिन शेख,  सतीश  कानगरे, राहुल कसबे,सचिन पठारे,दीपक त्रिभुवन, विजय त्रिभुवन, धर्मेंद्र त्रिभुवन,रोशन त्रिभुवन, चंद्रसेन भोसले,कैलास भाटे,लहानु त्रिभुवन, सूचित कांबळे,नामदेव त्रिभुवन, शुक्लोधन मोरे, आदी या वेळी उपस्थित होते
या वेळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीला
 उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती व तहसीलदार राहुल गायकवाड ,धोंडिरामसिंह राजपूत, साहेबराव पडवळ यशवंत पडवळ,यांनी झेंडा दाखविला तर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अन्नदान वाटप करणयात आले

No comments:

Post a Comment