शेतकऱ्याला शेतात गांजा लावणे पडले महागात.* - Vaijapur News

Breaking

Sunday, October 17, 2021

शेतकऱ्याला शेतात गांजा लावणे पडले महागात.*

*शेतकऱ्याला शेतात गांजा लावणे पडले महागात.* 

 _वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील शेतकऱ्याचा कारनामा; चक्क तुरीच्या शेतात लावली गांजाची झाडे ._
_तब्बल १५७ किलो गांजासह ९,४२०००/- रुपयांचा मुद्देमाल रुपये जप्त._
गांजाचे उत्पादन तसेच वितरणवर बंदी असून सुध्दा नालेगाव येथील शेतकऱ्याने मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा लावला होता.
या गांजा शेतीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल १५७ किलो गांजा पकडला. तसेच ३०३ गांजाची झाडे हस्तगत करून नऊ लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..

No comments:

Post a Comment