वाचन प्रेरणा दिन" उत्साहात साजरा - Vaijapur News

Breaking

Saturday, October 16, 2021

वाचन प्रेरणा दिन" उत्साहात साजरा

वैजापूर ता,१६
माजी राष्ट्रपती ए, पी,जे,अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन संपूर्ण देशात "वाचन प्रेरणा दिन"म्हणून पुस्तक वाचून त्यांना अभिवादन करतात,या दिनी येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांनी चार तास पुस्तक वाचन करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला,आपल्या समारोपीय भाषणात माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी वाचनाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तक व्यतिरिक्त वर्तमान पत्र वाचावे,गोष्टीची पुस्तके वाचावी, तसेच वाढदिवस प्रसंगी चॉकलेट ,बिस्कीट वाटप करण्यापेक्षा पुस्तके भेट द्यावीत असे सुचविले त्यांनी वाचू, वाचू,वाचू पुस्तके आम्ही वाचू ही कविता सादर करून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिली,  प्रास्तविक मुख्याध्यापक जी,जी,राजपूत यांनी केले,सूत्र संचलन व आभार बी,बी,जाधव यांनी मानले या प्रसंगी शिक्षिका नीता पाटील,सुवर्णा बोर्डे, राजश्री बंड, लता
सुखासे,ज्योती दिवेकर,वैशाली पगारे,श्रीमती मूळे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

No comments:

Post a Comment