औरंगाबद शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन- २ भागात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात चार दिवस उलटून गेले तरी शहर पोलिसांच्या हाती ठोस कोणतेही धागेदारे लागलेले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात संशयितांना ओळखण्यात यश मिळत असताना संबंधित व्यक्तीं सतत दिशाभूल करत असल्यामुळे तपासात अडचण निर्माण होत आहे.
ज्यारात्री खून झाला, त्या रात्रीचे आणि त्याअगोदरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता त्यात कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त कोणीच घरात आलेले दिसले नाही. त्यामुळे राजन शिंदे यांचा खून अत्यंत प्लॅनिंग करून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
खून झाल्यानंतर पहाटे मुलगा घराबाहेर पडतांना आणि नंतर अंबुलन्स घरी आणल्याचे दिसत आहे. तिसरं कुणीच दिसले नाही यामुळे खून घरातल्यानीच कुणी केला असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
खुनाचा तपास करण्यासाठी शहरातील टॉपच्या अधिकाऱ्यांच्या टीम तयार केल्या असून प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र व विशेष काम देण्यात आले आहे.
तांत्रिक जबाबदारी सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांच्याकडे,
सीसीटीव्ही फुटेज जमा करणे, लोकेशनचा आणि वेळेचे गणित जुळविण्याची जबाबदारी उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाकडे,
उस्मानाबादेत सहायक उपनिरीक्षकांची टीम पाठविली होती.
फिल्डची जबाबदारी उपनिरीक्षक दत्ता शेळके, अमोल मस्के, आहेर यांना सोपविलेली आहे.
संशयितांची चौकशी करण्याचे काम निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे आणि महिलांची चौकशी उपनिरीक्षक अनिता फासाटे करीत आहेत.
उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव या सर्व तपास पथकांत समन्वय साधण्याचे काम करीत आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या दिशानिर्देशानुसारच सर्व पथके कृती करत आहेत.
No comments:
Post a Comment