तालुक्यातील शिऊर येथे पत्नीचा छळ करून जीवंत जाळणाऱ्या पतीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम मोहीनद्दीन एम ए यांनी जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तर तीन वर्ष सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदीची शिक्षा ता.१३ रोजी सुनावली. ज्ञानेश्वर वरपे, रा.शिऊर असे शिक्षा ठोठण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, घटनेतील आरोपी ज्ञानेश्वर वरपे हा वर्ष २०१६ मध्ये शिऊर येथील एका शेतवस्तीवर पत्नी शोभा वरपे व मुलांसह वास्तव्यास होता. ज्ञानेश्वर हा अति मद्यपान करून पत्नी शोभा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर हा दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने पत्नी व मुलांंना मारहाण केली. दुसऱ्या दिवशी शोभा ही झोपेतुन लवकर न उठल्यामुळे ज्ञानेश्वर याने तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावर रॉकेल ओतुन पेटवून दिले. यावेळी त जावेने अंगावर पाणी टाकून आग विझवली व वैद्यकीय उपचारसाठी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारा सुरु असतांंना पोलीसांंनी शोभा वरपे हिचा जवाब नोंंदविला. ११ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान शोभा हिचा मृत्यु झाला. याप्रकरणी शिऊर पोलीसांनी न्यायालयात आरोपी ज्ञानेश्वर याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी १२ साक्षीदार तपासले. विशेष न्यायदंडाधिकारी शिवानंद बिडवे यांनी मयताचा मृत्युपूर्वी घेतलेला जवाब, डॉ प्रशांंत भानुशाली, मयताचा भाऊ काकासाहेब व बहिण लताबाई यांची साक्ष यावेळी महत्वाची ठरली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने वरिलप्रमाणे निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांंनी कामकाज पहिले तर पैरवी अधिकारी म्हणून शिऊर पोलीस ठाण्याचे बदने यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment