आमच्या पाण्याचे नियोजन आम्हाला करू द्या ,5 आवर्तन पाहिजे-आमदार बोरनारे - Vaijapur News

Breaking

Monday, November 8, 2021

आमच्या पाण्याचे नियोजन आम्हाला करू द्या ,5 आवर्तन पाहिजे-आमदार बोरनारे

आज औरंगाबाद सिंचन भवन कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाषजी देसाई साहेब  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नांदुर मधमेश्वर कालवा सल्लागार समिती आढावा बैठक संपन्न झाली. 
 
भाम, भावली, मुकणे,वाकी हे चारही धरणामध्ये 11 TMC पाणी वैजापूर, गंगापूर सिंचनासाठी आरक्षित असुन, औद्योगिकरणासाठी, पिण्याचे पाणी, बाष्पीभवन,  वहानवे व अकस्मीत पाणी असे अनेक कारणासाठी 3.25 TMC पाणी आरक्षित करून हक्काचे 11 TMC पाणी असुन 4 TMC पाण्याचे नियोजन करण्याचा अहवाल नाशिक पाटबंधारे विभागाने आजच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला.

सादरील प्रस्तावास आमदार प्रा रमेश बोरनारे  यांनी विरोध केला तसेच 5 आवर्तनाची मागणी रब्बी चे 2 व उन्हाळी 3 प्रत्येकी 1.5 TMC चे हक्काचे आवर्तन सोडण्याची व वितरिकेसाठी शेतकार्याची भुसपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी केली, 

वरिल चारही धरणाचे नियंत्रण व व्यवस्थापन लाभक्षेत्र कार्यालय औरंगाबाद विभाग यांच्याकडे देण्यात यावे ही देखील मागणी आमदार  यांनी केली.तसेच सदरील नाशिक-औरंगाबाद संबंधीत विभागातील अधिकारी यांची मंत्री महोदय यांच्या दालनात बैठक घेण्यात यावी अशी विनंती मा मंत्री महोदय यांना करण्यात आली. 
तसेच नांदूर-मधमेश्वर कालव्या कालव्यावर वैजापूर गंगापूर व्यतिरिक्त जे पाण्याचे आरक्षण असेल असेल असे आरक्षण रद्द करावे आणि गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने यावर सिंचन व्यातिरीक्त  कोणते आरक्षण टाकू नये असे कालवा सल्लागार समितीमध्ये ठराव मांडण्यात आला.

याप्रसंगी संचालक  कुलकर्णी , अधीक्षक अभियंता सर्व कार्यकारी अभियंता कालवा सल्लागार समितीचे सदस्य बाबासाहेब पाटील जगताप व अंकुश पाटील सुंभ हजर होते

1 comment:

  1. आमदार साहेबांचे म्हणणे योग्य आहे.

    ReplyDelete