वैजापूर ता,११
तांत्रिक शिक्षणचे महत्व जाणून देशातील विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने या शिक्षणाचा पाया रचून या शिक्षणाच्या
सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौ,अबुल कलाम आझाद हे दूरदृष्टीचे जाणकार शिक्षण तज्ज्ञ होते,असे प्रतिपादन केले से,नि, शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले,ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौ,अबुल कलाम
मौ,आझाद विद्यालयात मौ,आझाद यांना अभिवादन कार्यक्रम होता त्या प्रसंगी ते बोलत होते,ते पुढे म्हणाले की,"आज देशातील विद्यार्थ्यांनी जगात जे ज्ञान, कौशल्य व तंत्रज्ञान चे अत्युच्च शिखर गाठले आहे, याचे श्रेय मौलाना अबुल कलाम आझाद यांनाच जाते, से,नि, प्राचार्य डॉ,व्ही,एन,ढाकरे,व क्रीडा शिक्षक अंजुम पठाण यांनी मौ,अ,कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,अध्यक्षस्थानी विद्यालय मुख्याध्यापक घनश्याम राजपूत होते, या प्रसंगी से,नि, नायब तहसीलदार बी,के,राजपूत,दिलीपसिंह राजपूत,शिक्षक बी,बी,जाधव, श्री,सोमासे,संदीप शेळके, श्री,महाले,डॉ,जाधव,श्री ,खैरनार,श्रीमती द्वारका गायकवाड,श्रीमती शिंदे,यांची उपस्थिती होती,सुत्रसंचलन व आभार बी,बी,जाधव यांनी मानले,
No comments:
Post a Comment