सामाजिक बांधिलकी जपत जैन जागृती पाठशाळा व जैन सोशल ग्रुप च्या वतीने दिवाळी फराळ वाटप - Vaijapur News

Breaking

Wednesday, November 3, 2021

सामाजिक बांधिलकी जपत जैन जागृती पाठशाळा व जैन सोशल ग्रुप च्या वतीने दिवाळी फराळ वाटप

वैजापूर ता,०४
सामाजिक बांधिलकी जपत येथील जैन जागृती पाठशाळा व जैन सोशल ग्रुप च्या वतीने दिवाळी दिनी गुरुवार(ता,०४)रोजी येथील देवी मंदिर परिसर व स्वस्तिक टाकीज परिसरात असलेल्या  आदिवासी बंधू भगिनींना दिवाळी फराळ पॅकेज प्रत्येक घरात व प्रत्येक मुला-मुलींना  बिस्कीट पुडे प्रकाश शेठ बोथरा व स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत  ,निलेश पारख व प्रफुल संचेती यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, फराळ जैन जागृती पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता त्या पैशातून हा फराळ व बिस्कीट पुडे गोर गरीब,दीन दुबळे आदिवासी यांची दिवाळी गोड व्हावी  म्हणून  फटाक्याच्या पैशातून हा दिवाळी फराळ वाटप केला, या कार्यक्रमास मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेतीचे सहकार्य लाभले,जैन जागृती पाठशाळेचे शिक्षक राजू संचेती यांनी मुलांना संबोधित केले तर श्री राजपूत यांनी कोरोना बाबत जागृती करून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले, या प्रसंगी दीपक लोढा, स्वप्नील संचेती,महेश हिरण, रुपेश संचेतीपरेश संचेती, यांच्या सह जैन जागृती पाठशाळेचे विद्यार्थी व जैन सोशल ग्रुप चे सदस्य यांनी सहकार्य केले,(फोटो कॅप्शन-प्रकाश शेठ बोथरा,धोंडिरामसिंह राजपूत, राजू संचेती दिवाळी फराळ बॅग देताना)

No comments:

Post a Comment