व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली ही बैठक._
_बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीदेखील उपस्थित होते._
राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र आजही अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.
ज्या जिल्ह्यांचे लसीकरण कमी झाले आहे, अशा ४५ जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतला.
यामध्ये महाराष्ट्रामधील औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नंदुरबार, बुलडाणा, अकोल्याचा जिल्ह्याचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे एकूण प्रमाण सध्या ५५ टक्के आहे. त्यात पहिला डोस घेणारे ५५, तर दुसरा डोस घेणारे २२ टक्के नागरिक आहेत.
एकूण ३२ लाख २४ हजार ७७६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे त्यापैकी १७ लाख ७४ हजार २७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ७ लाख २६ हजार ६३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे
या आढावा बैठकीच्या एक दिवस आगोदर औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी लसीकरण वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण सुरु केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment