जेष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य आनंदी सुखी,समाधानी,व आरोग्यादायी जगता यावे,त्यांना शासनाच्या सर्व सोयी सुविधांचा माहिती व्हावीआरोग्य
सुविधा मिळाव्या ,त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देश,समाज
ला व्हावा यासाठी गाव तेथे जेष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांची संलग्नता उत्तर मराठवाडा फेस्कॉम नांदेड विभागाशी जोडावी या साठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत या साठी औरंगाबाद येथील एन-५येथील प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवा भावी संस्थेच्या गीता भवन येथे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम चे अध्यक्ष अशोक तेरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार(ता,२९)रोजी बैठक पार पडली, या बैठकीत प्रगतिशील संघ चे अध्यक्ष भरतकुमार कुलकर्णी,सचिव श्रीकांत पत्की, वैजापूर जेष्ठ नागरिक संघ चे सचिव धोंडीरामसिंह राजपूत,तसेच स्मिता कुलकर्णी,प्रेमचंद लुल्ले आदी उपस्थित होते,औरंगाबादेत४७ जेष्ठ नागरिक संघ आहेत तर जालना येथे १२जेष्ठ नागरिक संघ आहेत,वैजापूर येथे ४ जेष्ठ नागरिक संघ आहेत,या संघाच्या बैठका घेऊन
त्यांना सलनग्नता बाबत,व विविध योजना बाबत माहिती देऊन त्यांना सक्रिय करण्यासाठी व गाव तेथे-जेष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न
करण्याचे ठरले आहे,(फोटो कॅप्शन-अशोक तेरकर मार्गदर्शन करतांना शेजारी धोंडीराम राजपूत,श्री पत्की)
No comments:
Post a Comment