वैजापूरचे प्रति गाडगेबाबा धोंडीरामसिंह राजपूत यांना स्वच्छता व समाजसेवेचा "सेवा गौरव पुरस्कार"प्रदान - Vaijapur News

Breaking

Saturday, December 30, 2023

वैजापूरचे प्रति गाडगेबाबा धोंडीरामसिंह राजपूत यांना स्वच्छता व समाजसेवेचा "सेवा गौरव पुरस्कार"प्रदान


वैजापूर ता,०१

येथील प्रति गाडगेबाबा च्या भूमिकेत राहून गत ३०वर्षांपासून  स्वच्छतादूत संत गाडगेबाबा  यांचा स्वच्छतेचा वसा , समाज सेवा,अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण चा वारसा ,पाणी वाचवा पाणी जिरवा,मेरी माटी -मेरा देश, माझी वसुंधरा महिला सक्षमीकरण,कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून भूमिका करून समाज बांधिलकी जपणे असे उपक्रम राबवून समाज सेवा करणारे, समाजसेवक ,समाजसेवी म्हणून समाज कार्य करणारे ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांच्या या कार्याची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)येथील  सु-लक्ष्मी बहुउदेशीय सेवा भावी संस्थेने त्यांना माणुसकी समूहाचा"समाजसेवी गौरव पुरस्कार "  देऊनशनिवार रोजी  त्यांच्या समाजसेवेचा गौरव केला,संत गाडगेबाबांच्या समाज कार्याची ओळख करून देणारे स्मृती चिन्ह ,गौरव पत्र व सन्मान पत्र , प्रति गाडगेबाबा धोंडीराम राजपूत यांना सपोनि दामिनी पथक आरती जाधव,सपोनि वर्षा व्हगाडे,सपोनि देविदास वाघमोडे, जेष्ठ पत्रकार स,सो,खंडाळकर, सुमित पंडित,ज्यू,चार्ली
सोमनाथ स्वभावणे,प्रा,शरद सोनवणे,हभप दीपक पाल महाराज,चेतन पाटील,पूजा पंडित,मीरा पंडित,देविदास पंडित यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, मौ,अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात रक्तदान शिबिर ही घेण्यात आले,व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम ही संपन्न झाले,धोंडीराम राजपूत याना  हा समाजसेवी गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे(फोटो कॅप्शन-समाजसेवी गौरव पुरस्कार प्रति गाडगेबाबाच्या वेषात स्वीकारताना ठा,धोंडीरामसिंह राजपूत व ईतर)

No comments:

Post a Comment