वैजापुरात जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीव आरोग्य सल्ला,उत्तम प्रतिसाद - Vaijapur News

Breaking

Tuesday, January 2, 2024

वैजापुरात जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीव आरोग्य सल्ला,उत्तम प्रतिसाद



वैजापूर ता,०२
येथील आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने व
वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघ,आधार जेष्ठ नागरिक संघ,चैतन्य जेष्ठ नागरिक सेवा संघ व उत्कर्ष जेष्ठ नागरिक महिला संघ यांच्या सहकार्याने मंगळवार(ता,०२)रोजी शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले ,या शिबिरात जेष्ठ नागरिकांची सर्व प्रकारची आरोग्य मोफत स्वरूपात
तपासणी करून त्यांना योग्य सल्लाही तज्ञ डॉक्टरांनी तपासून दिला,कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जायंट्स ग्रुप च्या अध्यक्षा विद्याताई चापानेरकर,होत्या तर प्रमुख पाहुणे डॉ,अमोल अन्नदाते ,डॉ,एस, एम, जोशी,डॉ व्ही,जी शिंदे, तसेच चारही  जेष्ठ नागरिक संघचे अध्यक्ष प्रकाश शेठ बोथरा,अण्णासाहेब शेळके, प्रा,पी,एम ,शिंदे,व सौ, अंजली जोशी यांच्या सह डॉ,अरविंद अन्नदाते,सौ,आनंदी अन्नदाते,मेजर सुभाष संचेती, जाएन्ट्स सदस्या डॉ ,सौ,  कविता शेळके ,यांची उपस्थिती होती,आरंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व जायंट्स प्रार्थना झाली,कार्यक्रम प्रास्ताविक सौ ,अंजली ताई जोशी यांनी केले व गेल्या २५ वर्षांपासून जाएन्ट्स च्या सामाजिक,शैक्षणिक,दिव्यांग क्षेत्रातील कामाचा आढावा सादर केला,डॉ,एस, एम, जोशी,व डॉ,अमोल अन्नदाते, ,सौ आनंदी अन्नदाते यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकाना आरोग्य बाबत,व जिवनमान बाबत मार्गदर्शन केले, सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार संतोषी भालेराव यांनी मानले,या प्रसंगी जाएन्ट्स च्या अलका साखरे अनघा आंबेकर,उपाध्यक्ष सुनीता साखरे,वैशाली साखरे,सचिव चंदा लहामंगे, कोषाध्यक्ष रत्नमाला कुलकर्णी,ईला पालेजा,साक्षी मुगदीया, दर्शना मुगदिया,यंग सहेली च्या सचिव भक्ती जाधव,जेष्ठ नागरिक उत्तमराव साळुंके, बबनराव क्षीरसागर,कृष्णा कांबळे,श्री शेटे,  संतोषी भालेराव,संगीता भालेराव यांची उपस्थिती होती,नंतर आनंद हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जेष्ठ नागरिकांची मोफत तपासणी केली व मार्गदर्शन ही केले ,(फोटो कॅप्शन--डॉ,जोशी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना, व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर)

No comments:

Post a Comment