व्ही,पी,कॉलेज मध्ये एक दिवशीय राष्ट्रीय मतदार जन-जागृती कार्यशाळा - Vaijapur News

Breaking

Thursday, January 25, 2024

व्ही,पी,कॉलेज मध्ये एक दिवशीय राष्ट्रीय मतदार जन-जागृती कार्यशाळा


वैजापूर ता,२५
राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त येथील व्ही,पी,कॉलेज 
मध्ये गुरुवार(ता,२५)रोजी राष्ट्रीय मतदार दिन निमित्त
मतदार जनजागृती कार्यशाळा,युवक मतदारांचे मतदान बाबत जागृती ,प्रत्यक्ष डमी मतदान करून मतदान प्रक्रिया प्रात्यक्षिक सह दाखविणे  १८वर्षावरील युवा मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन,व मतदान विषयी मतदार साठी ची प्रतिज्ञा असे विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय मतदार दिन संपन्न करण्यात आला, या कार्यक्रमात तहसीलदार सुनील सावंत यांनी या बाबत मार्गदर्शन करतांना विशद केले की,सर्व पात्र मतदार यांनी स्वतः तर मतदान करावे परंतु आपल्या कुटुंबासह शेजारी पाजारी यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले, व राहीलेल्या १८वर्षवरील सर्वांनी मतदार यादीत  नाव नोंदवून घ्यावे,प्राचार्य डॉ,शिवाजीराव थोरे यांनीही मतदान सक्तीचे असावे व  मतदार यादीतील सर्वांनी मतदान कारण्यासाठी युवकांनी त्यांना मतदान महत्व सांगावे असे आवाहन केले
निवडणूक तज्ज्ञ प्रशिक्षक धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुढील घोषवाक्य उच्चरात "युवा मतदार -लोकशाही दमदार " व युवकांचें मतदान--लोकशाही चा सन्मान" "मतदार राजा जागा हो--लोकशाहीचा धागा हो"म्हणून युवकांना मतदान महत्व समजावून सांगून युवा मतदार
यांनी येणाऱ्या काळात सर्वच निवडणुक- प्रकियेत स्वतः मतदान करावें व इतरानाही  मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहान केले'कार्यक्रम सूत्र संचलन, प्रा,एन, व्ही,खंदारे यांनी केले,तर प्रास्ताविक डॉ,आबासाहेब कसबे यांनी केले,या प्रसंगी उप प्राचार्य
डॉ,संदीप परदेशी व राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक वृंद,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,तदनंतर 
प्रा, काळे यांनी  ईक्ट्रॉनिक यंत्र द्वारे मतदान करण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष मुलां  --मुलींनी डमी मतदान करून व्हीव्हीपॅट पध्दतीने मतदान नोंद कशी होते ते जाणून
घेतले,(फोटो कॅप्शन-प्रत्यक्ष एव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या मतदान विषयी माहिती देताना ,तहसीलदार
सुनील सावंत, धोंडीराम राजपूत, डॉ, थोरे,डॉ,कसबे)

No comments:

Post a Comment