जेंव्हा,जेंव्हा या भूतलावर धर्माची हानी होते,धर्म तत्व
नाकारून अमानवीय कृत्य घडतात तेंव्हा, तेंव्हा या भूतलावर जगत पिता प्रभू रामचंद्र जन्म घेतात व त्या अमानवीय असुरी शक्तींचा नायनाट करतात असे अमृत वक्तव्य रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांनी मंगळवार(ता,२३)रोजी रामकथेचे द्वितीय पुष्प गुंफताना केले,प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव त्यांच्या कथेतून त्यांनी सादर करून प्रभू रामचंद्र यांनी आतापर्यंत पांच जन्म घेतल्याचे व असुरी शक्ती नेस्तनाबूत केल्याचे वक्तव्य केले, शंकर-पर्वती पुत्र कार्तिकेय व श्री गणेश यांच्या बाबत ते म्हणाले की,कार्तिकेय हे पुरुषार्थ चे प्रतीक आहेत तर श्री गणेश हे विवेकाचे प्रतीक आहेत,प्रभू रामचंद्र यांचा
जन्म झाल्यानंतर प्रतिकृती स्वरूपात बाळ प्रभू यांचा व्यासपीठावर पाळणा दाखविण्यात आला,आयोजक
माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगावकर,यांनी पाळणा धरला तर सौ, विजयाताई चिकटगावकर व
परिवारातील अन्य महिलांनी पाळणा गीत गाऊन प्रभूंचे जन्म स्वागत केले,आरतीचे मानकरी म्हणून हभप पंढरीनाथ ढंगारे महाराज,हभप संजयमहाराज ,
शिवसेनेचे जेष्ठ नेते,उपजिल्हाप्रमुख ऍड आसाराम रोठे
माजी नगरसेवक लिमेश बापू वाणी, माजी सरपंच भाऊसाहेब गलांडे,सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत, महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा वैजपुरचे अध्यक्ष दीपक बरकसे,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम,नारायणी सेनेचे महाराष्ट्र चेअध्यक्ष अशोक आप्पा पवार, गणेश अनर्थे,से,नि, प्राचार्य डॉ,वसंतराव ठोंबरे,यांनी आरती केली,या प्रसंगी वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, साईनाथ मतसागर,अजय पा,चिकटगावकर,सम्राट राजपूत,ऋषी राजपूत, सह रामभक्त महिला -पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्र संचलन व आभार प्रशांत शिंदे यांनी मानले,(फोटो कॅप्शन-आरती करतांना हभप ढंगारे महाराज, धोंडीराम राजपूत, अशोक पवार व ईतर)
No comments:
Post a Comment