वैजापूरात छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे थाटात वितरण - Vaijapur News

Breaking

Sunday, August 4, 2024

वैजापूरात छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे थाटात वितरण

 
वैजापूर ता,०४
राज्याच्या विविध विभागात व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कलावंत,समाजसेवक, आध्यात्मिक  क्षेत्रातील प्रबोधनकार, शिक्षक,नृत्य ,कृषी क्षेत्र, व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  कार्यकर्त्यांना जिजाऊ बहुउदेशीय सेवा भावी संस्थेच्या
वतीने आयोजक  सूर्यकांत रामदास मोटे पाटील, पोलीस पाटील गोयगाव ता,वैजापूर व पोलीस पाटील जिल्हा संघ सचिव च्या वतीने रविवार(ता,०४)रोजी
राज्यातील २४ कार्यकर्त्याना "छत्रपती शिवाजी महाराज" "राष्ट्रीय  गौरव पुरस्कार"२०२४देऊन गौरविण्यात आले,या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती येथील पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस
निरीक्षक बी,ए,देशमुख व स,पो,नी, मनोज पाटील यांच्या सह चित्रपट अभिनेता संकेत निकम,मुंबई येथील अभिनेत्री उर्मिला डांगे, दौंड येथील गीताबाई बंब विद्यालय चे प्रमुख बाजीराव घोरपडे,रत्नागिरी जिल्हा परिषद विद्यालय मुख्याध्यापिका दिप्ती यादव,आयोजक सूर्यकांत मोटे पाटील,महाराष्ट्र शासनाने दोन मानाचे  पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केलेले सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत, यांची उपस्थिती होती,छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन,जिजाऊ वंदना ने कार्यक्रम आरंभ
झाला,सूर्यकांत मोटे पाटील यांनी प्रास्ताविक केले,ठा,
धोंडीरामसिंग राजपूत यांनी सूत्र संचलन  केले,आभार अविनाश चव्हाण यांनी मानले, संकेत निकम,उर्मिला 
डांगे, दीप्ती यादव व बाजीराव घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले,कु,सरगम,त्रिभुवन यांनी भरतनाट्यम सादर केले,गायत्री चव्हाण व नमस्वी मतसागर,कार्तिक जगताप, यांनीही आपली कला सादर केली,सौ जयश्री
मोटे,केदार मोटे,श्रद्धा मोटे,अरुण पाटील,यांनी सहभाग नोंदविला, शाहीर अशोक बागुल व त्यांच्या टीमने शाहिरी सादर केली,दीपक त्रिभुवन यांनी चित्रपट गीत गायिले,मोती वाघ यांनी ही सहकार्य केले या प्रसंगी उत्तमराव निकम,शिवनाथ  राहणे, पत्रकार विजय जाधव,डॉ,गणेश बहुरे,शीतल जाधव, रत्ना वैष्णव,रत्नाकर पाटील,दिगंबर भुजबळ,यांची उपस्थिती होती.
(फोटो कॅप्शन - पुरस्कारर्थी सोबत आयोजक सूर्यकांत मोटे,धोंडीराम राजपूत,उर्मिला डांगे,दीप्ती यादव)

No comments:

Post a Comment