दिवसेंदिवस निसर्गाचे बदलणारे चित्र व निकृष्ट प्रकारच्या भोजनाची पध्दती यामुळे आज भारतीय नागरिकांचे जीवन कमालीचे अस्वस्थ ,रोगी व गुंतागुंतीचे बनत आहे,या जीवनातून मुक्ततेसाठी "वेलनेस अँड फिटनेस सेंटर "शिवाय पर्याय नाही
असे नगराध्यक्षा सौ,शिल्पाताई परदेशी यांनी मंगळवार(ता,१० )रोजी केले,आरंभी "नवजीवन वेलनेस अँड फिटनेस "सेंटर चे उदघाटन सौ ,परदेशी व जेष्ठ नागरिक तथा लेखक धोंडीरामसिंह राजपूत यांनी
फीत सोडून केले,या प्रसंगी श्री राजपूत ,यांनीही उपस्थिताना आरोग्य बाबत व वेलनेस क्लब चे जीवनातील महत्व बाबत संबोधित केले, आरोग्य सल्लागार जयत गवारे ,तसेच दीपक थोरे,यांनीही उपस्थितीताना आरोग्य बाबत व वेलनेस फिटनेस बाबत मार्गदर्शन केले,शहरात हा तिसरा वेलनेस क्लब आरंभ ,झालेला आहे,स्टेशन रस्त्यावरील ,हे सेंटर भरत खुडे व सौ,सुनीता भरत खुडे,हे चालवणार आहेत,त्यांना जागतिक आरोग्य सल्लागार विलास म्हस्के सहकार्य करणार आहेत,या प्रसंगी श्याम काकडे यांनी सूत्र संचलन केले तर आभार विलास म्हस्के यांनी मानले,
या प्रसंगी अवधूत धोकटे,श्याम काकडे,संतोष काकडे,संतोष गायके, यांनी सहभाग नोंदविला,पत्रकार संघ सचिव किरणसिंह राजपूत, श्री,शेळकेतसेच कन्नड गंगापूर,व ग्रामीण भागातून नागरिक उपस्थित होते ,(फोटो कॅप्शन-सौ ,शिल्पाताई परदेशी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना ,शेजारी दिपक थोरे,धोंडीराम राजपूत)
No comments:
Post a Comment