वैजापूर ता,१२
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी श्री.गणेशोत्सव व श्री. शिवजयंती उत्सव आरंभ करून तत्कालीन समाजाला संघटित होऊन समाज व देशासाठी विधायक व रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले,लोकमान्य टिळकांचा जो हेतू होता तोच हेतू आज गणेश भक्तांनी पाळण्याची नितांत गरज आहे, भले प्रश्न व समस्या वेगळ्या असतील मात्र हेतू विधायक असावा असे प्रतिपादन करून आवाहन समाज कार्यकर्ते धोंडीरामसिह राजपूत यांनी येथील कुबेर प्रतिष्ठाणच्या गणपतीची आरती केल्या नंतर या मडळाच्या तरुण युवकांना व गणेश भक्तांना बुधवार(ता,११)रोजी केले,कुबेर प्रतिष्ठाण गणेश मंडळाचे हे पाहिले वर्षं आहे ,मात्र या मंडळाने शाडूच्या मातीची श्री,गणेश मूर्ती स्वतःच्या संकलित आर्थिक सहाय्याने बसवलेली आहे.येथील गो -शाळेतील गायींना चारा-पाणी व्यवस्था केली, वृक्षारोपण केले आहे,
अथर्व शीर्ष पठण ही केले आहे,रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे,गुरुवार पासून "व्यसन राज"नाटिका समाज व्यसन मुक्त करण्यासाठी आरंभ
करणार आहेत,तर अनंत चतुर्दशी दिनी श्री .विसर्जन
(डीजे) न लावता भारतीय पारंपरिक वाद्य लावून श्री ,मूर्ती विसर्जन करणार आहेत, धोंडीरामसिंह राजपूत यांनी या मंडळाच्या या पर्यावरण पूरक श्री .गणेशोत्सव ची स्तुती करून देशातील सर्व गणेश मंडळांनी वैजापूरच्या कुबेर प्रतिष्ठाण च्या गणेश मंडळांच्या उपक्रमाचें अनुकरण करून हा श्री ,गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे
.या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघचे अध्यक्ष प्रकाशशेठ
बोथरा, साई प्रतिष्ठाणचे गोविंद शेठ दाभाडे, गोकुळ भुजबळ, विशाल तांबे, यांच्या सह मंडळाचे तरुण पदाधिकारी उपस्थित होते, शेवटी गौरव दौडे यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन -कुबेर प्रतिष्ठाण गणेश मंडळाची आरती करतांना धोंडीरामसिंह राजपूत, प्रकाश बोथरा,गोविंद दाभाडे,गोकुळ भुजबळ व इतर)
No comments:
Post a Comment