दरवर्षी संपूर्ण देशात १४सप्टेंबर हा हिंदी भाषा दिन म्हणून विविध कार्यक्रमानी संपन्न होतो,शनिवार(ता१४
रोजी येथील सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत,गाणी,कथा
व गीत गाऊन हिंदी भाषेविषयी जागृती करण्यात आली, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत होते,त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व विशद करीत हिंदी भाषा देशात विविध पोषाख व विविध भाषा बोलणाऱ्या समस्त भारतीयांना एका माळेत जोडण्याचे कार्य करते असे सांगितले.या समयी मुलांनी"हम सब भारतीय है"हे गीत सादर केले तर समर पठाण याने हिंदीत कथा सादर केली,या इंग्लिश शाळेच्या प्रिंसिपल डॉ, ज्योती मोहन,उपप्राचार्य सौ,बरखा पाटणी, यांनी या हिन्दी दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते,छोट्या मुलांनी हिंदी भाषेतील विविध गुणदर्शन कला सादर करून
हिंदी भाषेविषयी आत्मीयता दर्शवली त्यांना शिक्षिका श्रीमती बोर्डे,श्रीमती गुप्ता यांनी सहकार्य केले,(फोटो कॅप्शन -हिंदी दिवस निमित्त धोंडीरामसिंह राजपूत यांचे स्वागत करताना डॉ सौ ,ज्योती मोहन,सौ,बरखा पाटणी व ईतर)
No comments:
Post a Comment