देशातील युवकांनी जीवनातील चढ-उतारानी भरकटुनन जाता,संयम,सामंजस्य मार्ग स्वीकारावे - Vaijapur News

Breaking

Saturday, September 14, 2024

देशातील युवकांनी जीवनातील चढ-उतारानी भरकटुनन जाता,संयम,सामंजस्य मार्ग स्वीकारावे

वैजापूर ता,१४
देशातील युवक म्हणजे एक महाशक्ती होय,युवक म्हणजे जोश,उत्साह,प्रचंड ऊर्जा,प्रचंड आत्मबल अशा
या महान युवा वर्गाने जीवनातील अपयशाने किंवा चढ
उतारांनी गोंधळून न जाता,"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक"हे तंत्र आचरणात आणून जीवनाला सावरावे व सक्षम,व भक्कम राष्ट्र उभारणीत हात भार लावावा"असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व जेष्ठ समाजसेवक ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी शनिवार(ता,१४)रोजी
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा  ओम शांती
बहुउदेशीय शिक्षण संस्थेच्या "अटलबिहारी वाजपयी
होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल "येथे श्री गणेशोत्सव निमित्त आयोजित डॉ, एस, एम,देसरडा व्याख्यानमालेचे  सहावे पुष्प गुंफताना"आजची युवा पिढी" या विषयावर बोलताना केले,श्री, राजपूत पुढे म्हणाले की,ज्या देशाचे युवक-युवती उच्च विद्याविभूषित,कर्तृत्व सम्पन्न,चारित्र्यसम्पन्न, व उद्यमशील असतात त्या देशाचे भवितव्य उज्वल तर असतेच पण त्या देशाची सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम प्रगती होते,यास्तव युवकांनी  परिस्थिती कितीही विपरीत असली तरी न भरकटता, व्यसन व विकारांच्या आहारी न जाता संयम,व सामंजस्याने
परिस्तिथीवर मात करावी" असे आवाहन के चेअरमन  प्रशात देसरडा यांच्या मार्गदर्शखाली ही व्याख्यानमाला सुरू आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेडिकल कोलेजच्या प्राचार्य डॉ,पिया बेग,उपप्राचार्य डॉ,पंकज दुगड, व सुरेश कोठुळे होते,
डॉ,स्नेहा जंगम यांनी सूत्र संचलन केले,तर डॉ,मयुरी
कोठूळे यांनी आभार मानले,या प्रसंगी डॉ,हर्षदा सूर्यवंशी, पार्थवी वाघेला व यांनी सहभाग नोंदविला,(फोटो कॅप्शन- सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ साहित्यीक
धोंडीरामसिंह राजपूत, डॉ,दुगड, डॉ, बेग,व श्री कोठुळे)

No comments:

Post a Comment