जगायचं राहून गेलं! असं म्हणण्याची वेळ कोणत्याहीजेष्ठ नागरिकांवर अंतिम समयी येऊ नये-डी.राजपुत - Vaijapur News

Breaking

Sunday, December 1, 2024

जगायचं राहून गेलं! असं म्हणण्याची वेळ कोणत्याहीजेष्ठ नागरिकांवर अंतिम समयी येऊ नये-डी.राजपुत


वैजापूर ता,०१
जगात जेष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याना आरोग्याच्या योग्य सुविधाही आहेत, तरी
पण आपल्या अंतिम श्वास समयी माझं हे राहून गेले!माझं ते करायच राहून गेलं !असे करण्याची माझी ईच्छा होती,पण तसं करू शकलो नाही!असं म्हणण्याची वेळ कोणत्याही जेष्ठ नागरिकांवर येऊ नये ,म्हणून ६० -६५ वयाच्या जेष्ठांनी याच वयात आपल्या राहिलेल्या इच्छा ,आकांक्षा , अपूर्णकार्य, पूर्ण करून घ्यावीत म्हणजे अंतिम समयी हे जगायचं राहून गेलं,ते जगायचं राहून गेले अशी खंत मनात राहणार नाही. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,०१)रोजी येथील चैतन्य जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या  बैठकीत जेष्ठ  नागरिकांच्या वाढ दिवसाचे अभिष्टचिंतन करतांना केले.अध्यक्षस्थानी रवींद्र आप्पा साखरे होते,तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ नागरिक  उत्तमराव  साळुंके व चैतन्य चे अध्यक्ष साहेबराव साळुंके यांची होती. राजपूत पुढे म्हणाले की,"वाढत्या
वया बरोबर स्मृतिभ्रंश वाढतो,  या साठी प्रत्येक जेष्ठांने
बोलके असावे,उलटे अंक पाढे मोजावे,कोडे सोडवावे,
आदी,कृती कराव्यात. आरंभी भारत माता पूजन झाले.भागवत सरांनी साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकचि धर्म सादर केली.प्रास्ताविक कोषाध्यक्ष कृष्णराव कांबळे यांनी केले.नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वाढ दिवस आहेत त्यांचे गुलाब पुष्प व शाल देऊन अभिष्टचिंतन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषण रवींद्र अप्पा साखरे यांनी केले तर समारोप सा.मा.साळुंके यांनी केला.आभार व सूत्र संचलन एस.डी त्रिभुवन यांनी केले.या प्रसंगी जेष्ठ नागरिक सुरेश संत,रामदास रत्नपारखी,आर.पी.क्षीरसागर, बबनराव क्षीरसागर, बी,बी,बाविस्कर. सुभाष चाफेकर,
अण्णासाहेब शेळके,प्रेमसिंग राजपूत,श्री मगर,सुदाम आप्पा गोंधळे, एस. टी. देशपांडे,श्री,श्रीवास्तव,यांच्या सह संघाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-जेष्ठ नागरिक श्री भराडे यांचे अभिष्टचिंतन करतांना धोंडीराम राजपूत,रवींद्र साखरे
साहेबराव साळुंके,उत्तमराव साळुंके व ईतर

No comments:

Post a Comment