वैजापूरात एच आय व्ही एड्स जनजागृती फेरीला मोठा प्रतिसाद - Vaijapur News

Breaking

Monday, December 2, 2024

वैजापूरात एच आय व्ही एड्स जनजागृती फेरीला मोठा प्रतिसाद

 
वैजापूर ता,०२
संपूर्ण जगातून एच आय व्ही एड्स चे उच्चाटन व्हावे,
समाजाला एड्स ची माहिती मिळावी, व देशातून ही एच आय व्ही एड्स चे उच्चातनव्हावें म्हणून १डिसेंबर ते ७ डिसेंबर या सप्ताह निमित्त सोमवार(ता,०२)रोजी वैजापूर शहरातून उपजिल्हा रुग्णालय ,प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने मोठी  भव्य जनजागृती फेरी काढून जनजागृती करण्यात आली.डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चित्र प्रदर्शन ही भरविण्यात आले.प्रथम या चित्र प्रदर्शन चे उदघाटन आ,रमेश पा,बोरनारे यांच्या वतीने त्यांचे बंधू संजय बोरनारे,सामाजिक कार्यकर्ते  व जिल्हा आरोग्य
समिती सदस्य ठा, धोंडीरामसिंह राजपूत व उपजिल्हा
रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ,डी,एन, मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ,दीपमाला परदेशी यांनी फीत सोडून केले.नंतर डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या फेरीचे उदघाटन करण्यात आले.या फेरीत आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग, व कदम नर्सिंग कॉलेज चे सर्व विद्यार्थी,
करुणा निकेतन व जि, प,कन्या प्रशाला चे विद्यार्थी,तसेच प्रेरणा सामाजिक संस्थेचे सर्व कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी ,सहभागी झाले होते.जि,प,प्रशाला मुलींची येथे धोंडीरामसिंह राजपूत यांनी "जागतिक एड्स दिन"शपथ सर्वांना दिली. या वर्षाचे जागतिक आरोग्य संघटनेचे घोष वाक्य आहे"मानवी हक्काच्या मार्गावर चालु--एच आय,व्ही एड्स बाबत भेद भाव मिटवू".फेरीतील विद्यार्थ्यांनी घोषणा देत व हातातील फलक प्रदर्शित करून जन जागृती केली .या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे  विजय पाटील,शशिकांत पाटील,श्याम उचीत, राहुल मापारी,संजय पवार, किशोर वाघुले,मनीषा मुळे, श्रीमती पाटील,भाग्यश्री मॅडम, पंकज कांबळे,तसेच प्रेरणा सामाजिक संस्थेचे  साईनाथ बारगळ, बापू वाळके,हिंदोळे,ज्ञानेश्वर भारुड,श्री अविनाश ,व्ही,पी,कॉलेज चे सर्वश्री हिवाळे, पुरी,प्रशाळेचे पगार ,सूर्यवंशी, वाघ, श्रीमती भोये
इत्यादीनी सहभाग नोंदविला,शेवटी विजय पाटील यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-जनजागृती फेरीला
ध्वज दाखविताना सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिह राजपूत,संजय बोरनारे ,डॉ,मोरे,व ईतर)

No comments:

Post a Comment