मध्यंतरी निवडणूक आचार संहिता असल्याने श्री गणेश उत्सव मंडळाच्या उत्कृष्ट देखाव्याना बक्षीस वितरण होऊ शकले नाही,पोलीस दिन ही होऊ शकला नाही यामुळे हे कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार(ता,१७) रोजी आयोजित करण्यात आले.गणेश उत्सवातील परीक्षक समिती अध्यक्ष ठा,धोंडीरामसिंह राजपूत, सदस्य काशीनाथ भावसार व संतोषी भालेराव यांच्या समितीने पर्यावरण पूरक उत्सव साजरा करणे, समाजातील व्यसनाधीनता घालविणे,वृक्षारोपण ,स्वच्छता ,बेटी बचाओ -"बेटी पढाओ अशा विषयावर आधारित कार्यक्रम सादर केले त्यांचे खालील प्रमाणे क्रमांक काढले प्रथम--कुबेर
प्रतिष्ठाण गणेश मंडळ, द्वितीय-- श्री ,स्वामी समर्थ गणेश मंडळ, तृतीय-जय श्रीराम गणेश मंडळ ,खंडाळा ता,वैजापूर व उत्तेजनार्थ-जैन एकदंत गणेश मंडळ वैजापूर यांना अनुक्रमे। ₹-पांच हजार--₹.तीन हजार व तृतीय ₹-दोन हजार नकदी रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ मंडळाला प्रमाणपत्र असे बक्षीस उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले,याच कार्यक्रमात रक्तदान शिबिर ही घेण्यात आले संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्त पेढी यांनी २०रक्तदात्यांचे रक्त संकलन केले,पेढीचे डॉ, अमर,आप्पासाहेब सोमासे,गजानन वाघ,राधा पठाडे,आशा सिस्टर, यांनी रक्तदात्यांचे रक्त संकलित केले,याच कार्यक्रमात श्री ,विसर्जन मिरवणुकीत, व निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या माजी सैनिकांनी व पोलीस पाटील यांनी सहकार्य केले त्यांना ही उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले,ज्ञानेश्वर मेटे यांनी सहभाग नोंदविला( फोटो कॅप्शन-पोलीस निरीक्षक श्री कोठाळे रक्तदान करताना व कुबेर प्रतिष्ठाण चे पदाधिकारी बक्षीस स्वीकारताना)
No comments:
Post a Comment