ब्रह्मलिन वैराग्यमूर्ती स्वामी दत्तगिरीजी महाराज यांचे समाधी मंदिर हे पूर्ण दगडात व्हावे अशी सर्व संत,महंत व सेवेकरी यांची मनापासून ईच्छा कारण प.पु.दत्तगिरी महाराज यांनी जेथे,जेथे शिव मंदिर उभे राहिले तेथे त्यांनी स्वतः खाणीतून दगड काढून पुरविले म्हणून त्यांचे समाधी मंदिर पूर्ण दगडात बांधण्याचा भूमीपूजन सोहळा गीता जयंती दिनी राज्यातील विविध धार्मिक स्थळ व आश्रमातून आलेल्या संत, महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.दत्तगिरी आश्रमात विधिवत पूजन झाल्यानंतर कोपरगाव बेट आश्रम चे मठाधिपती महंत
स्वामी रमेशगिरीजी महाराज, भांगशी मातागड चे श्री, श्री,१००८, महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज, पोहेगाव आश्रम च्या श्री,श्री१००८महामंडलेश्वर शारदा नंद गिरीजी माता महाराज,निमगाव आश्रम प,.पु. भोलेगिरीजी महाराज,शिवटेकडी आश्रम चे प.पु सोमेश्वरगिरीजी महाराज, पपु ब्रह्मलिन दत्तगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी प.पु ज्ञानानंदगिरीजी महाराज,शिवकथाकार रामायणाचार्य अनंत महाराज
वहाडणे(धारणगाव) व आ,प्रा,रमेश पा, बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब पा, चिकटगावकर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून कुदळ लावून भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समाधी मंदिर बांधकाम रूपरेषा सेवेकरी
व जेष्ठ समाज कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी उपस्थितासमोर सादर केली व संचलन करून आभार मानले.हे समाधी मंदिर पूर्ण दगडात होणार असून यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे.बऱ्याच संत,महंतांनी,भक्त भाविकांनी ,तसेच लोकप्रतिनिधी यांनी आर्थिक रुपात व वस्तू रुपात सहाय्य करण्याचे
शब्द दिले आहेत.या प्रसंगी शिवसेना चे राजेंद्र पा, साळुंके,पारस घाटे,
रामहरी बापू जाधव, भाजपाचे नारायण कवडे, प्रशांत कंगले,दशरथ बनकर,तसेच एकनाथ जाधव,रमेश हाडोळे, व भक्त ,भाविक उपस्थित होते.(फोटो कॅप्शन -आ,बोरनारे कुदळ लावतांना, महंत रमेशगिरी महाराज,महंत परमानंदगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, महंत ज्ञानानंदगिरी महाराज व भक्त भाविक)
No comments:
Post a Comment