जागतिक सिकलसेल आजार च्या जनजागृती कक्षाचे उदघाटन - Vaijapur News

Breaking

Wednesday, December 11, 2024

जागतिक सिकलसेल आजार च्या जनजागृती कक्षाचे उदघाटन


 
वैजापूर -ता,११
जागतिक सिकल सेल आजाराचे  लवकरात लवकर निदान होऊन या आजाराचे  समूळ ऊच्चाटन व्हावे या साठी आरोग्य, शिक्षण, समाज स्तरांवर मोठ्या प्रमाणात जन जागृती व्हावी व संपूर्ण मानवजात रोग मुक्त व्हावी या साठी सर्व थरावर सर्वांनीच सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहन बुधवार(ता,११)रोजी जिल्हा आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती सदस्य  ठा,धोंडीरामसिंह राजपुत यांनी उपस्थित सर्व रुग्णांना केले.जिल्हा रुग्णालयाचे वतीने बुधवार ता, ११ते १७ डिसेंम्बर पर्यंत सिकलसेल आजार बाबत जन जागृती करण्यात येत असून विविध उपक्रम
सप्ताह करण्यात येत  आहे, या जनजागृती उपक्रमचे 
उदघाटन राजपूत व सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी राजपुत   बोलत होते,ते पुढे म्हणाले की,जर रुग्णाला अशक्तपणा जाणवत असेल, सांधे दुःखी असेल,शरीर पिवळसर पडत असेल,असह्य वेदना होत
असतील व बालकांना वारंवार जंतू संसर्ग होत असेल,
तर सरकारी रुग्णालयात जाऊन तात्काळ   रक्त  तपासणी कररून व्हावी व उपचार घ्यावे,हा आजार अनुवांशिकही असतो.म्हणून वरील लक्षणे दिसू लागल्यावर तपासणी करून घ्यावी. याचे जंतू विळ्या
च्या आकाराचे असतात याचे ही खबरदारी खबरदारी
घ्यावी.-या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ, के,जे,अहिरराव, डॉ, ,पी,एस,बेदपाठक
तसेच विभाग प्रमुख लक्ष्मीकांत दुबे,पंकज कांबळे,
 श्याम उचित,किशोर वाघुले,रविकांत गडकरी,तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्तीत होते.सूत्र संचलन
किशोर वाघुले यांनी केले ,आभार लक्ष्मीकांत  दुबे  यांनी मानले,आता आठवडाभर या जागतिक सिकलसेल आजाराबाबत विविध उपक्रम घेऊन या आजाराची माहिती रुग्ण पर्यंत पोहचविणार आहे.(फोटो कॅप्शन -जागतिक सिकल सेल दिन निमित्त उप जिल्हा रुग्णालयात कक्ष उदघाटन करताना रुग्ण कल्याण समिती व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीराम राजपूत, वैद्यकीय अधिकारी डॉ,अहिरराव, व डॉ,वेदपाठक) 

No comments:

Post a Comment