श्री स्वामी समर्थ मंदिरात "गुरू चरित्र पारायण"साठीस्वामी समर्थ भक्तांचा मोठा उत्साह - Vaijapur News

Breaking

Tuesday, December 10, 2024

श्री स्वामी समर्थ मंदिरात "गुरू चरित्र पारायण"साठीस्वामी समर्थ भक्तांचा मोठा उत्साह


वैजापूर ता,११
येथील श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व  संस्कार केंद्रात
श्री स्वामी समर्थ भक्त आणि सेवेकरी यांनी श्री गुरुचरित्र वाचनासाठी मोठी नोंदणी केली असून सदरील पारायण दोन सत्रात करण्यात आलेले आहे.जवळ पास पाचशेवर भक्त भावीक ",गुरुचरित्र
पारायण "पठण करीत आहेत.श्री दत्त जयंती निमित्त दरवर्षी या मंदिरात पारायण असते. मोनिका गंडे,व अनिता राजपूत वाचक असून त्यांच्या समवेत भक्त
वाचन करीत आहेत.या वर्षी मोठया संख्येने परायनार्थी असल्याने जागा कमी पडत आहे म्हणून दोन सत्र केले आहे. आयोजक माजी नगरसेवक लिमेश वाणी, सेवेकरी सुरेश आलूले,सुमनबाई आलूले
सी,के,पवार,गुलाबराव पवार, तुषार अनर्थे, संतपाळ,
दत्ता रोजेकर,अरविंद तुपे परिश्रम घेत आहेत त्यांना स्वामी सेवेकरी राजेंद्र जानराव व जेष्ठ नागरिक ठा,धोंडीरामसिंह राजपूत सहकार्य करीत आहेत.(फोटो कॅप्शन -गुरू चरित्र वाचनात मग्न असलेले श्री स्वामी समर्थ भक्त)

No comments:

Post a Comment