वर्गीकरण व तुलना करणे थांबवा-धोंडीरामसिंह ठाकूर
वैजापूर ता.०९
आज जागतिक पातळीवर महिला व मुलींवर मोठ्या
प्रमाणात लैंगिक अत्याचार, छेड -छाड ,हिंसा,व मारझोड करण्याचे प्रकार वाढत आहेत, हे थांबविण्यासाठी महिला कडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलणे जसे गरजेचे आहे ,तसेच महिला-महिलांत वर्गीकरण करण्याची पध्दती बदललल्यास २१ व्या शतकात महिला हिंसाचार थांबू शकतात असे वक्तव्य
माजी शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ साहित्यिक ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी सोमवार(ता,०९)रोजी
ग्रामीण भागातील तिडी येथे केले.निर्मला इन्स्टिट्यूट या सामाजिक संस्थेच्या वतीने "महिला हिंसाचार विरुद्ध" महिला जागृती कार्यक्रम अंतर्गत महिला व शालेय मुली यांची फेरी काढण्यात आली त्या समयी राजपूत महिलांना संबोधित करीत होते,अध्यक्ष स्थानी
जि, प, प्राथमिक शाळा तिडी च्या मुख्याध्यापिका विद्या देशमुख होत्या तर प्रमुख पाहुण्या निर्मला इन्स्टिट्यूटच्या मार्गारेट डिब्रेटो व छाया बंगाळ यांची
प्रमुख उपस्थिती होती.राजपूत पुढे म्हणाले की,विधवा
महिलांना हळदी-कुंकवाला न बोलवणे, एखाद्या महिलेला बाळ होत नाही म्हणून हिनवणे, दुर्दैवाने एखाद्या स्त्रीचा पती वारला तर त्याच्या पत्नीला दोष देणे,दुर्दैवाने पति निधनानंतर महिलेच्या हातातील बांगड्या फोडणे,मस्तिष्क वरील कुंकू पुसणे.पुत्रवती
तर श्रेष्ठ समजल्या जाते मात्र निपुत्रिक व विधवा यांच्यात भेद भाव नको,एखाद्या महिलेला मूळ बाळ होत नाही म्हणून तिला दोषी समजणे हे प्रकार थांबविणे काळाची गरज आहे.पुरुष व महिला कुटुंब
रुपी रथाची दोन चाके आहेत, त्यानी कदापिही श्रेष्ठ
कनिष्ठ समजू नये, ते दोघेही सम -समान आहेत ,असेही राजपूत पुढें म्हणाले, महिला व मुलींकडे पाहण्या पुरुषी दृष्टीकोण बदलने गरजेचे आहे,तरच महिला व मुलींवरील अन्याय थांबतील व २१शतकात
स्त्रीवरील अन्याय ,अत्याचार थांबतील.निर्मला इन्स्टिट्यूट च्या मार्गारेट डिब्रेटो, छाया बंगाळ, यांची उपस्थिती होती. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती पटेल यांच्या सह गावातील महिला व शालेय शिक्षिका उज्वला गवळी,मंगला सोनवणे, रेखा देवरे,छाया उचित, प्रणिता चोपडे, वैष्णवी गायकवाड, व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिला जनजागृती फेरीत",एक दोन तीन चार-नारी शक्ती चा जय जय कार", "नारी शक्ती -देश की शक्ती", "नारी सन्मान -देश का सन्मान"एक नारी-देशाला तारी",अशा घोषणा व फलक दाखवीत महिला, मुलींनी तिडी गावात " महिला हिंसा विरुद्ध"
जागृती केली. सूत्र संचलन शिक्षक प्रशांत चौधरी यांनी केले तर आभार उज्वला गवळी यांनी मानले.(फोटो कॅप्शन--तिडी ता,वैजापूर येथे महिला हिंसा विरुद्ध जन जागृती फेरीत धोंडीराम राजपूत, विद्या देशमुख, ऊज्वला गवळी, रेखा देसले(देवरे)व श्रीमती पटेल)
No comments:
Post a Comment