शहरातील श्री,दत्त प्रसाद महानुभाव आश्रमात भगवान दत्तात्रय यांच्या जन्मोत्सव निमित्त बुधवार(ता,१८)रोजी"पंच अवतार उपहार"कार्यक्रम संत -महंत यांच्या उपस्थितीत उत्साहाने सम्पन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र व्यास बाबा होते तर प्रमुख अतिथी आ,रमेश पा, बोरनारे यांच्या पत्नी सौ,संगीता रमेश पा,बोरनारे होत्या.आरंभी संत,महंत व पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन व दीप प्रज्वलन कऱण्यात आले.या आश्रमाच्या प्रमुख श्रद्धाताई कपाटे यांनी संत महंतांचे पूजन करून प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजन बाबत विशद केले की,व्यक्ती जीवनाला देवांच्या ध्यान व चिंतनानेच शांती व समाधान मिळते,
देवाचे स्मरण होऊन त्यांच्या विधायक मार्गाने व्यक्ती गेल्यास जीवन जगण्याचे सार्थक मिळते असे त्या म्हणाल्या,सौ संगीता रमेश बिरनारे म्हणाल्या की,हा आश्रम गोकुळमय होण्यासाठी मी आमदार साहेबांकडून सर्व सहकार्य मिळवून देईल,महंत विद्याताई अमृते यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले,.अध्यक्ष यांनी विशद केले की,भगवंत चिंतनानेच खरे सुख प्राप्त होते. समाज कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी सूत्र संचलन केले,व प्रभाकर सोनवणे यांनी आभार मानले.उपस्थित सर्व भक्त भाविकांना महाप्रसाद प्रदान करण्यात आला ,सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी महंत नंदलाल बाबा,विलास लोणारकर, नंदा ताई अमृते, सजनराव गायकवाड, सरपंच दौलतराव गायकवाड, बाबासाहेब इंगळे, डॉ,बाबासाहेब इंगळे, रतीलाल गायकवाड, श्रीमती बोठे ताई,श्रीराम गायकवाड,एस, एस, डोंगरे,अशोक शेटे, यांच्या सह महिला वर्ग मोठ्यासंख्येने हजर होते.(फोटो कॅप्शन-आमदार बोरनारे यांच्या पत्नी संगीता बोरनारे ,श्रद्धा कपाटे,धोंडीराम राजपूत व ईतर)
No comments:
Post a Comment