प्रभावी प्रशासन आणि सर्वांगीण विकासाठी महिलासक्षमीकरण आणि नेतृत्व काळाची गरजजेष्ठ समाजसेवक -----धोंडीरामसिंह राजपूत - Vaijapur News

Breaking

Saturday, July 12, 2025

प्रभावी प्रशासन आणि सर्वांगीण विकासाठी महिलासक्षमीकरण आणि नेतृत्व काळाची गरजजेष्ठ समाजसेवक -----धोंडीरामसिंह राजपूत


वैजापूर ता,१३
स्थानिक स्वराज्य संस्था असोत की पंचायत ,पालिका
प्रशासन असो हे अधिक प्रभावी व कार्यक्षम करून गावांचा व शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी व जेष्ठ समाजसेवक
धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील जरूळ
येथे निर्मला इन्स्टिट्यूट मार्फत आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात  शनिवार(ता,१२) केले. ते पुढे म्हणाले की,"ग्रामसभा"ही लोकशाहीचा आत्मा समजल्या जात असून ग्रामसभा नियमित व्हाव्यात व त्यात गावातील पुरुष व महिलानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व गावाच्या गरजांचे ठराव घेऊन ते मंजूरीस्तव वरिष्ठांना पाठवून कार्यान्वित करावे असे ही राजपूत पुढे  म्हणाले.या प्रसंगी गावच्या सरपंच शोभाबाई सदाशिवराव मतसागर यांचे प्रतिनिधी देविदास मतसागर,उपसरपंच परसराम  दामू बागुल,सदस्य अनिल बागुल,रोहिदास बागुल.यांच्या सह निर्मला इन्स्टिट्यूट च्या मार्गारेट रोद्रीग्ज,तारिका इक्का,छाया बंगाळ यांच्या सह गावकरी व शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक निर्मला इन्स्टिट्यूट च्या मार्गारेट यांनी करून महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहुन सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी मुख्याध्यापक पी.टी, तांबे,श्री
पवार,यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी देविदास मतसागर यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-धोंडीराम राजपूत, देविदास मतसागर मार्गारेट व इक्का)

No comments:

Post a Comment