वैजापूर ता.११
देशाच्या विकास व उन्नतीत सर्वात मोठा अडथळा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे देशाची वाढती भरमसाठ लोकसंख्या होय,असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक व जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंग राजपुत यांनी "जागतिक लोकसंख्या दिन"निमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात "वाढती लोकसंख्या एक संमस्या" या विषयावर बोलताना केले.ते पुढे म्हणाले की,जो पर्यंत भारतीय नागरिक वाढत्या लोकसंख्या चे ,दुष्परिणाम समजून घेऊन कुटुंब विस्तारावर नियंत्रण आणीत नाही तो पर्यंत देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती होत नाही.,शासनानेही वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध बसावा म्हणून कायदे
काढून व महिला-पुरुष प्रबोधन करून वाढत्या लोकसंख्येला पायबंद घालावा असेही राजपूत पुढे म्हणाले.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बी.एन. मोरे यांच्या मार्गदर्शनखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी,डी, अहिर-
राव,वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल साळुंके, वैद्यकीय
अधिकारी डॉ.फरा मॅडम,डॉ.पालवे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन तंत्रतज्ञ
किशोर वाघुले यांनी केले.या प्रसंगी आरोग्य कर्मचारी
माया पाटील, मनीषा मुळे, विजय पाटील, शशिकांत पाटील सर्वश्री इष्टके, बिडवे,,मोरे,विणकर ,लक्ष्मीकांत
दुबे,श्री,चौधरी,व मोठया संख्येने रुग्ण उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत,महिला प्रबोधन करताना,शेजारी
किशोर वाघुले,माया पाटील व डॉ,अहिरराव)
No comments:
Post a Comment