गुरुपौर्णिमा उत्सवात अवतरले वैजापूरचे प्रति साईबाबा - Vaijapur News

Breaking

Thursday, July 10, 2025

गुरुपौर्णिमा उत्सवात अवतरले वैजापूरचे प्रति साईबाबा

वैजापूर/बेलापूर ता.११
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा दिनी गुरुवार(ता,१०) रोजी बेलापूर--श्रीरामपूर येथील श्री साईबाबा मंदिरात "गुरूंपोर्णिमा"उत्सवात वैजापूरचे प्रतिबाबा ठा,धोंडीरामसिंह राजपूत अचानक अवतरुन
मंदिरात उपस्थित भक्त भाविकांना आश्चर्यचकित केले.निमित्त होते गुरू पौर्णिमा निमित्त येथील श्री साई पावन प्रतिष्ठान बेलापूर बुद्रुक व श्री साई सेवा समिती बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १०व्या "गुरुपौर्णिमा " उत्सव निमित्त आयोजित साई सच्चरीत ग्रंथ पारायण समापण समारंभ.या प्रसंगी साईबाबा मूर्तीची  भव्य पालखी शोभा यात्रा काढण्यात आली.झाझरी, ढोल ,व लेझीम पथक ,श्री साईबाबांचे भजन व गीत यांनी व प्रति साईबाबाचा सहभाग सर्वचआनंद ओसंडून वाहत होता.महिलांनी आपला आनंद पांच पावली व फुगडी खेळून व्यक्त केला.सर्वत्र साईबाबांच्या नावाचा गजर याने वातावरण आनंदमय व उत्साही होते.या प्रसंगी भक्त -भाविकांना महाप्रसाद ही वाटप करण्यात आला.आयोजक कैलास चायल व त्यांचे सर्व सहकारी तसेच प्रतिष्ठान व समिती पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला या प्रसंगी सहदेव महाराज  व वैजापूरचे नारायणी सेनेचे राज्य अध्यक्ष अशोक पवार खंडाळकर यांची व परिसरतील प्रतिष्ठित व्यक्ती ची
उपस्थिती होती(फोटो कॅप्शन-सहदेव महाराज प्रति साईबाबा धोंडीराम राजपूत यांचा सत्कार करताना शेजारी अशोक पवार)

No comments:

Post a Comment