अहिल्यानगर येथे ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या रेडिओ श्रोता मेळावा संदर्भात बैठक संपन्न* - Vaijapur News

Breaking

Wednesday, July 9, 2025

अहिल्यानगर येथे ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या रेडिओ श्रोता मेळावा संदर्भात बैठक संपन्न*

 अहिल्यानगर (दि.८) :  अहिल्यानगर येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संमेलन नियोजना संदर्भातील बैठक नुकतीच भोसले लॉन्स, बुरुडगाव रोड,अहिल्यानगर येथे घेण्यात आली.श्रोता संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष श्री.आदिनाथ अन्नदाते (अहिल्यानगर), उपाध्यक्ष श्री.अशोक पाटील .बकु पिंपळगांव (नेवासा) अहिल्या नगर. आणि  सचिव श्री.बिरजू परदेशी (शेवगाव) तसेच ज्येष्ठ श्रोते श्री.राजेश साबळे पाटील (छत्रपती संभाजीनगर),धोंडीराम सिंह राजपूत (वैजापूर) यांच्या  प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.                                           या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून झी टी.व्ही.लिटिल चॅम्प विजेती कु.सुरभी कुलकर्णी आणि कु.गौरी पगारे . पुजा डेंगळे  सिने व सिरीयल अभिनेता -उदय माळी.यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याच बरोबर विविध कार्यक्रम कोणते घ्यायचे त्या संदर्भात देखील चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या मध्ये म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा, रेडिओ दिंडी, पोवाडा, हास्यविनोदी कार्यक्रम, श्रोते परिचय,लकी ड्रॉ बक्षिसे आणि आणखी काही रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.                       आजच्या मीटिंगसाठी आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी श्रोते राजेश साबळे (संभाजीनगर), गोविंद पिसाळ (मांजरी,राहुरी), श्रीराम गोंधळी (शेवगाव), धोंडीराम सिंह राजपूत सर(वैजापूर), बंडू लोहार पोपळघट (खुपटी), आप्पासाहेब जाधव, वैजापूर.आदेश पांगरकर, शिर्डी .अमोल लोखंडे, नेवासा .सुरेश माळोदे, कोपरगाव . सुनिल मुंगसे साहेब . कोपरगाव.अजय डोळसे,बायजाबाई जेऊर. कैलास सदामत सर पाथर्डी, बिरजू परदेशी,बालम टाकळी.अशोक पाटील बकु.पिपळगांव नेवासा .पोपट शिंदे पाटील.आदी श्रोते आणि संजय वैराग्य .अतुल सातपुते. संतोष मते सर
पोलिस पाटील.बाबासाहेब कानडे पाटील.सरपंच देवगड चे अजय साबळे पाटील.
मार्गदर्शक -आदिनाथ वाघ साहेब.संतोष वसाने

No comments:

Post a Comment