वैजापूर/छत्रपती संभाजीनगर --ता,१४
मराठवाडा विभागातील विद्यार्थी वर्गात बुद्धीमत्ता मोठ्या प्रमाणात आहे,मात्र त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सॉफ्ट स्किल विकसित करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे आयुक्त जितेंद्रजी पापळकर यांनी रविवार(ता,१३)रोजी एमजीएम परिसरातील रुख्मिनी सभागृहात १०वी,१२वी तील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या राजपूत भामटा /परदेशी भामटा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच यूपीएससी,एमपीएससी,बँकिंग,सेवा निवृत व विविध सरकारी कार्यलयात,मंडळ,महामंडळ ,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व नौकरी धारण करणारे बांधव/भगिनी यांचा यथोचित गौरव व सन्मान कार्यक्रमात श्री.पापळकर बोलत होते.ते पुढे म्हणाले की,सॉफ्ट स्किल प्राप्त करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या आई-वडिलांची व समाजाची सेवा करावी हेच खरे शिक्षण आहे,असेही पापळकर पुढे म्हणाले.जुन्या चालीरिती, अंधश्रद्धा यांचा त्याग करा,मदतीचा हात समाजाला द्या,एकमेकांचा हात धरल्याशिवाय पुढे जाता येत नाही,शेती उद्योगाला प्राधान्य द्या,वृक्षारोपण, जलसंधारण,,स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्या असे संबोधन करून त्यांनी गुणवंताना प्रमाण पत्र,सन्मान चिन्ह व बुके देऊन सत्कार केला.
राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठाण संभाजीनगर यांच्या द्वारे आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथीम्हणून संभाजीनगर विभागाचे अप्पर विभागीय आयुक्त खुशालसिंह राजपूत(गोलवाल) होते
तर अध्यक्ष स्थानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तोताराम बहुरे होते.व्यासपीठावर डॉ.भगवानसिंह डोभाळ,रामसिंग बहुरे,विठ्ठलसिंग परदेशी, भागवत बिघोत(राजपूत)
वैजापूरचे माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत
यांची उपस्थिती होती. आरंभी महापुरुष अभिवादन व दीप प्रज्वलन करण्यात आले.विभागीय अप्पर आयुक्त
खुशालसिंग राजपूत यांनी श्री. पापळकर यांचा परिचय करून दिला,व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,डॉ,भगवानसिंग डोभाळ,रामेश्वरीताई गोलवाल, यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,सूत्र संचलन सुभाष महेर यांनी केले आभार विजू मारग यांनी मानले.जवळपास दोनशे गुणवंतांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी राजपूत /परदेशी समाजातील महाराष्ट्रच्या विविध भागातून गुणवंत व मान्यवर उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-गुणवंत सोबत विभागिय आयुक्त श्री पापळकर, अप्पर आयुक्त खुशालसिंह ,तोताराम बहुरे,भागवत बिघोत)
No comments:
Post a Comment