वैजापूर -ता,२३
तालुक्यातील खंडाळा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत येथील१६रक्तदात्यांनी बुधवार (ता,२३) रोजी रक्तदान करून संत शिरोमणी सावता महाराज यांना अभिवादन केले."रक्तदान- श्रेष्ठदान " हे रक्तदानाने महत्व जनसामान्यात रुजऊन रक्तदान करण्यास प्रवृत्त
करणारे सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व नारायणी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक पवार खंडाळकर यांनी या रक्तदान स्थळी भेट देऊन संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्त पेढीचे सर्वश्री डॉ.अमर सातपुते, सहाय्यक आप्पासाहेब सोमासे,अजिनाथ बडक, राधा पठाडे,नैना जाधव यांनी सहकार्य केले.खंडाळा येथील
संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवाराने हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.(फोटो कॅप्शन रक्तदात्या सोबत आप्पासाहेब सोमासे,अशोक पवार,व धोंडीराम राजपूत)
No comments:
Post a Comment