महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास मंडळाला भरघोस आर्थिक तरतूद उपलब्ध करून देणारमंत्री ना,अतुल जी सावे- - Vaijapur News

Breaking

Sunday, July 6, 2025

महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास मंडळाला भरघोस आर्थिक तरतूद उपलब्ध करून देणारमंत्री ना,अतुल जी सावे-


वैजापूर/संभाजीनगर ता,०७
राजपूत /परदेशी  भामटा समाजाच्या   सर्वांगीण विकासाठी शासनाने गठीत केलेल्या महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.अतुलजी सावे यांनी रविवार(ता,०५)रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित  शिवराणा महाराणा प्रतापसिंह गुणवत्ता पुरस्कार -२०२५ गुणवंत विद्यार्थी व गुणवंत समाज कार्यकर्ते प्रदान करतांना दिले.चिखली( जि. बुलढाणा)च्या कर्तव्यदक्ष आमंदार   व महाराणा  प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी अधिवेशनात मागणी प्रकर्षाने लावून धरलेल्या आ.श्वेताताई महाले या प्रमुख अतिथी होत्या त्यांनी आपल्या भाषणात ना.सावे यांना मागणी केली की या महामंडळाला या अधिवेशनात ₹ दोनशे कोटी रुपये येण्याची तरतूद कारावी जेणेकरून या निधीतून
राजपूत/परदेशी भामटा समाजाच्या मुलां-मुलींसाठी
वस्तीगृह,भोजनालय,अभ्यासिका,शिष्यवृत्ती मिळवून देता येईल तसेच समाजाच्या महिला व पुरूष वर्ग आणि सुशिक्षित तरुण वर्गालाही रोजगार साठी निधी उपलब्ध करून दिला जाईलअशीही मागणी त्यांनी सादर केल व ,गुणवंत विद्यार्थी व गुणवंतांचे त्यांनी अभिनंदन केले.यावर बोलताना ना,सावे यांनी वरील आश्वासन दिले.कार्यक्रमास मुख्य अतिथी राज्याचे मुख्यमंत्री ना,देवेंद्रजी फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले यांची ही उपस्थिती होती.त्यांनी ही
सर्वोतोपरी सहाय्य   करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम आधी वैजापूर चे राजपूत समाजाचे जेष्ठ नागरिक व माजी शिक्षणाधिकारी ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर घडविण्याबाबत मार्गदर्शन केले.का
[07/07, 08:42] Thakur SIR: कार्यमाच्या अध्यक्षस्थानी समाजा चे जेष्ठ सदस्य भरतसिंह
घुनावत होते.आरंभी शूरवीर महाराणा प्रतापसिंह ,छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले,महात्मा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रम आरंभ झाला,.प्रास्ताविक एल. डी.ताटू, व ऍड .सुभाष कोकुल्लडे यांनी केले.या कार्यक्रमात वसंत हुंकारे यांचे आई-वडील या विषयावर प्रबोधन ही झाले.जवळपास दीडशे गुणवंत विध्यार्थी;पालक व गुणवंत समाजकार्यकर्ते याना हिंदवी सूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे स्मृती चिन्ह ,प्रमाण पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले,व्यासपीठावर उच्च न्यायालयचे ऍड.आनंदसिंह बायस,बी.बी.राजपूत,भगवानसिंह डोभाळ, वैजापूर राजपूत समाजाचे जेष्ठ नागरिक व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत,श्री .परिहार,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सर्वश्री एल. डी. ताटू,ऍड सुभाष कोकुल्डे, सौ,अंजली कोकुल्डे, आनंद बारवाल, भाऊसिंग बैनाडे,भरतसिंग घुनावत,काळूराम
सिंगल, व संघाचे सर्व सदस्य यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-मंत्री ना,अतुलजी सावे ,मार्गदर्शन करताना, व्यासपीठावर आ,श्वेताताई महाले,श्री,विद्याधर महाले, ऍड,बायस,श्री,राजपूत ,एल, डी, ताटू,ऍड,सुभाष कोकुल्डे व ईतर)

No comments:

Post a Comment