वैजापूर ता,०६
आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध श्री. विठ्ठल-रुख्मिनी मंदिरात भल्या पहाटे आरती करून महाप्रसाद वाटप रविवार(ता,०६) रोजी विविध मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले.येथील महाराणा प्रताप मार्गावरील एकटा विठोबा मंदिरात माजी नागरसेविका सौ,शोभबाई भुजबळ,व विलास भुजबळ यांच्या द्वारे सपत्नीक पूजा व आरती झाली तर लाडवाणी गल्लीतील नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या विठ्ठलेश्वर मंदिरात राहुल राजू सतपाळ व सौ,अंकिता राहूल सतपाळ यांच्या द्वारे आरती व पूजा सम्पन्न झाली,तर पाटील गल्लीतील विठ्ठल रुख्मिनी मंदिर,व वैजीनाथ महादेव मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ही पूजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.एकटा विठोबा मंदिरात आ,रमेश पा,बोरनारे ,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, जेष्ठतम नागरिक माजी पोलीस पाटील गुलाबराव साळुंके, सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत, अशोक पवार,गोकूळ भुजबळ तसेच विठ्ठलेश्वर मंदिर येथे माजी नगरसेवक रामदास टेके,श्री,व सौ मुकुंदशेठ दाभाडे,श्री व सौ.किसन बोरनारे,बोडखे तलाठी आप्पा,पुरोहित विजय जोशी,धोंडीराम राजपूत यांच्यासह भक्त भाविक उपस्थित होते,पाटील गल्ली मंदिर,महादेव मंदिर येथेही उल्हास साळुंके ,मधुकर साळुंके,यांच्या सह भक्त भाविक उपस्थित होते. श्री, स्वामी समर्थ मंदिर सेवा समिती यांनी महाप्रसाद वाटप केले.शहरात ईतर मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येऊन उत्सव आनंदात सम्पन्न झाला(फोटो कॅप्शन-विठ्ठलेश्वर मंदिरात श्री व सौ राहुल राजू संतपाळआरती करतांना)
No comments:
Post a Comment