वैजापूरात "तिरंगा -पदयात्रेला"उस्फुर्त प्रतिसाद - Vaijapur News

Breaking

Tuesday, August 12, 2025

वैजापूरात "तिरंगा -पदयात्रेला"उस्फुर्त प्रतिसाद

 
वैजापूर ता,११
ऑपेरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या  पार्श्वभूमीवर व येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त भारत शौर्य"तिरंगा पदयात्रा" वैजापूर शहरातील सर्व क्षेत्र व स्तरातील नागरिकांनी सोमवार(ता,११)रोजी सकाळी ठक्कर बाजार जुने बस स्थानक --संकट मोचन मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवराई मार्गे काढून हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक येथे सामूहिक राष्ट्रगीताने समारोप झाला.या "तिरंगा पदयात्रेत"माजी सैनिक,एन. सी.सी.छात्र,देशभक्त नागरिक, शहर व तालुक्यातील युवक,,महिला, गणेश मंडळ, व जीम, व्यायाम शाळा  व विविध सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील जेष्ठ नागरिक ,ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "भारत माता की जय" "वंदे मातरम"भारतीय सैनिकांचा विजय असो",ऑपेरेशन सिंदूर झिंदाबाद," "जय जवान -जय किसान"भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो "अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. "तिरंगा पदयात्रा "पदयात्रा भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ दिनेश परदेशी,  अविनाश पा, गलांडे, विशाल संचेती,कचरू पा, डिके,ज्ञानेश्वर जगताप,साहेबराव पा, औताडे ,मजीद कुरेशी,बिलाल सौदागर, प्रमोद कंगले, जयमाला वाघ,अनिता तांबे(गायकवाड),शैलेश चव्हाण, गौरव दौडे, राजेश गायकवाड, पदयात्रा नियोजक संदीप ठोंबरे,शैलेश पोंदे,प्रवीण तांबे,विनोद राजपूत,गोकुळ भुजबळ,गणेश खैरे,सेवा निवृत्त प्रा.जवाहर कोठारी,ज्ञानेश्वर अंदमाने, गिरीश चापानेरकर, जितेंद्र पवार,प्रेम राजपूत,जेष्ठ नागरिक व सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी ठा.धोंडीरामसिंह राजपूत ,गौरव दौडे,राजेश गायकवाड, किरण व्यवहारे,गोरख
मापारी,महेश भालेराव, श्री पठाण,रियाजुद्दीन शेख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,छत्रपती  शिवाजी महाराज,यांच्या पुतळ्याना व हुतात्मा जगन्नाथ भालेराव यांच्या स्मारकाला अभिवादन केले.कु .अक्षदा ,प्रा,कोठारी, ऍड.धरमसिंह,मेजर सातुरे, व श्रीमती शालिनीताई बुंधे यांनी मनोगत व्यक्त केले. या तिरंगा पद यात्रेत पालिकेचे कर्मचारी कर अधीक्षक ए,बी,मेरगु ,स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, सेंट मोनिका इंग्लिश विद्यालयाचे प्राचार्य किशोर साळुंके, एन. सी सी.छात्र व त्यांचे प्रमुख श्री पठाण, जिमचे सोनू राजपूत,जेष्ठ नागरिक,माजी सैनिक व तरुण वर्ग,महिला मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.राष्ट्र गीताने या"तिरंगा पदयात्रेचा"समारोप झाला. सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले आभार संदीप ठोंबरे यांनी मानले.(फोटो कॅप्शन--वैजापूरात ऑपेरेशन सिंदूर यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर निघालेली "तिरंगा पदयात्रा)
 
 

No comments:

Post a Comment