शेती मालाला भाव नाही.पाऊस दगा देतो, कर्ज ओझे,
निसर्ग कोप अशा विविध कारणांनी शेतकरी राजा काहीसा नाराज व निरुत्साहीआहे.दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा पोळा या वर्षी साध्या पध्दतीने,बँड कमी,बैलांना साध्या पद्धतीने सजवत शहर व ग्रामीण भागात पोळा "कही खुशी-कही गम" असा शुक्रवार(ता,२२)रोजी साजरा झाला.बळीराजानी आपल्या परिस्थिती प्रमाणे बैल सजविले पाटील गल्लीत असलेल्या मारोती मंदिराचे बैलांना दर्शन घडविले व नंतर संकट मोचन हनुमान मंदिर येथेही दर्शन घडवून बैलांना घरी नेऊन पुरण पोळी नैवद्य खाऊ घातला.विशेष म्हणजे इयत्ता 5 वी इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या पुस्तकात असलेली "बैल -पोळा"कवितेचे कवी धोंडीरामसिंह राजपूत यांनी ही बैल पोळा बैलां सोबत साजरा केला.शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मंदिरा जवळ व रस्त्यात जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र लक्ष्मीबाई रुपचंद जाधव,पो.कॉ, मेजर गायकवाड याचे सह पोलीस कर्मचारी सातर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.संकट मोचन मंदिर येथे पुजारी चंद्रकांत कुलकर्णी व धोंडीराम राजपूत यांनी बैलांचे पूजन केले.( फोटो कॅप्शन-बैलांचे पूजन करताना पुरोहित व राजपूत व बैल मालक)
No comments:
Post a Comment