महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील रेडीओ -आकाशवाणी श्रोत्यांचे संमेलन अहिल्यानगर येथे बुधवार(ता,२०)रोजी उत्साहात संपन्न झाले रेडिओ दिनाचे औचित्य साधत संमेलन समितीने हा कार्यक्रम बुरुडगाव रोड वरील भोसले लाँन येथे आयोजित केला होता पहिले श्रोता संमेलन याच जिल्ह्यातील शिर्डी येथे भरले होते. .कार्यक्रमात ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये रेडिओ ठेऊन दिंडी काढण्यात आली त्यात शिर्डीचे प्रतिसाईबाबा म्हणून ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांची भूमिका असलेले पात्र ही होते. महाराष्ट्र परंपरा गोंधळी संगीत गीतगाणी, श्रोता परिचय, गीत बहार गायन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हलनी जिल्हा नांदेड येथील श्रोता एस. के, पाटील होते तर मुख्य अतिथी राहता मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे होते. आरंभी द्वीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रम प्रास्तविक संमेलन समिती अध्यक्ष आदिनाथ अन्नदाते यांनी केले. या कार्यक्रमात राज्यातील व राज्याबाहेरील आलेल्या रेडिओ श्रोत्यांना सन्मान पत्र,स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.राज्यातील विविध आकाशवाणी केंद्राचे निवेदक या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते.आदल्या दिवशीं भक्ती संध्या व संगीत सितारे हा कार्यक्रम सादर झाला.सदरील कार्यक्रमात मराठी फेम सुरभी कुलकर्णी,व लिटल चॅम्प गौरी पगारे यांची ही उपस्थिती होती.आयोजन समितीचे अध्यक्ष- आदिनाथ
अन्नदाते, उपाध्यक्ष- अशोक पाटील,सचिव -बिरजू परदेशी,सदस्य-बंडू पोपळघट,कैलास सदामत,अशोक दळे,मार्गदर्शक सर्वश्री राजेश आश्रूबा साबळे,श्रीकांत
फड,अभिजित गव्हाणकर,संतोष वसाने,आप्पासाहेब जाधव, अभिजित गव्हाणकर ,धोंडीरामसिंह राजपूत,सौ.मंजुश्री बिरजू परदेशी,श्रीमती पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.�
[21/08, 17:06] Thakur SIR: विशेष सहकार्य म्हणून जगन्नाथ बसैये, नामदेव भुतेकर,रुखनोंद्दीन तांबोळी,राधाकीसन भिसे,संजय वैरागर दादा भाऊ तांबे,अजय डोळसे,सय्यद जलाल भाई,या सर्वांनी सहभाग नोंदवून हे संमेलन यशस्वी केले.या निमित्ताने आधारस्तंभ नामक स्मरणिका ही प्रकाशित करण्यात आली यात श्रोता परिचय आहे.(फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत यांचा सन्मान करताना एस. के.पाटील,व जगन्नाथ बसैये, अशोक पाटील,बिरजू परदेशी, आदिनाथ अन्नदाते)
No comments:
Post a Comment