वैजापूरात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त वैद्यनाथमहादेव मंदिरात रुद्र स्वाहाकार महायज्ञ उत्साहात - Vaijapur News

Breaking

Tuesday, August 19, 2025

वैजापूरात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त वैद्यनाथमहादेव मंदिरात रुद्र स्वाहाकार महायज्ञ उत्साहात

 
वैजापूर ता,१८
येथील वैद्यनाथ महादेव मंदिरात आ.प्रा.रमेश पा.बोरनारे आणि माजी आमदार भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.राजीव डोंगरे यांनी सोमवार(ता,१८)रोजी आयोजित केलेला" रुद्र स्वाहाकार महायज्ञ" उत्साहात संपन्न झाला.आ,रमेश पा,बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगावकर,डॉ.राजीव डोंगरे, बाबासाहेब पा. जगताप, डॉ.निलेश भाटिया, अमोल बोरनारे,शरद खैरनार,राजेंद्र चव्हाण यांनी रुद्र स्वाहाकार महायज्ञ महापूजा सपत्नीक  केली. या महायज्ञात ज्यानी नाव नोंदणी केलेली आहे त्यांना घरपोच दोन मुखी रुद्राक्ष पोहचतते करण्यात  येणार आहे असे डॉ.राजीव डोंगरे यांनी सांगितले. या प्रसंगी पालिकेचे माजी नगराध्यक्ष
साबेरखान, माजी कृषी उत्पन्न  बाजार समिती सभापती भागीनाथ दादा मगर,संजय पा,निकम,माजी पस.सभापती अंकुश पा. हिंगे,भाजपा जिल्हा सचिव दशरथ बनकर,शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे, युवा सेनाचे आमीरअली, डॉ.एस. एम.जोशी.सौ.अंजली जोशी, आनंदीताई अन्नदाते,सुप्रिया व्यवहारे, शोभाताई भुजबळ,डॉ,विजया डोंगरे, स्वप्नील जेजुरकर,प्रकाशशेठ बोथरा,उत्तमराव साळुंके,गोकुळ भुजबळ, संजय बोर नारे,रणजित चव्हाण,प्रशांत कंगले,विजयकुमार वेद, सुधाकर साळुंके, महेश भालेराव,बबन त्रिभुवन,वसंतत्रिभुवन, डॉ.विजयकुमार सोनी,मुकुंद दाभाडे, ठाकूरधोंडीरामसिंग राजपूत,महेश बुणगे, ऍड, देवदत्त पवार,डॉ,संतोष गंगवाल,अनिता दाणे,श्रीमती पुणे,सीमा जगताप, छाया बोरनारे,वर्षा बोरनारे,संगीता बोरनारे,श्रीमती आहेर,कमलेश आंबेकर,प्रदीप साळुंके, यांच्या सह शहरातील शिवसेना, युवासेना,महिला आघाडी भक्त -भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
 तीन तास ही यज्ञ पूजा सुरू होती.सूत्र संचलन ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत यांनी केले आभार प्रशांत नाना कंगले यांनी मानले( महायज्ञ पूजा करतांना आ.बोरनारे,माजी आ.चिकटगाकर ,व इतर) 

No comments:

Post a Comment