वैजापूरचे जेष्ठ साहित्यिक व पाठ्यपुस्तकातील कवी
धोंडीरामसिंह राजपूत यांची राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात त्यांनी लिहिलेली कविता "बैल-पोळा" विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून शिकत आहेत.येत्या शुक्रवार रोजी "बैल-पोळा"आहे, या अनुषंगाने येथील सेंट मोनिका इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या प्रमुख सौ.शिल्पाताई दिनेश परदेशी व प्राचार्य किशोर साळुंके यांनी राजपूत याना त्यांची कविता शिकविण्यासाठी या शाळेत निमंत्रित केले.धोंडीरामसिंह राजपूत यांनी आपली कविता"बैल-पोळा" ता,१९रोजी शाळेत जाऊन तीन तुकड्यांतील१२०विद्यार्थ्यांना ही कविता टाचन-पाठ काढून शैक्षणिक अध्ययन -अध्यापन पद्धतीने शिकविली.प्रत्यक्ष कवितेचे कवी वर्गात येऊन कविता शिकवीत आहेत, हे पाहून विद्यार्थी खूप आनंदित झाले.कवी आपली कविता प्रत्यक्ष वर्गात येऊन शिकवीत आहे हा अनुभव विद्यार्थ्यांना अतिशय आनंद देणारा होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी-आनंद
ओसंडून वाहत होता. धोंडीरामसिंह राजपूत सेवा निवृत्त होऊन१७वर्ष झाली आहेत,तरीही ते शिक्षकप्रमाणेच कविता शिकवितात.प्राचार्य किशोर साळुंके यांनी राजपूत यांचे शाल-गुच्छ देऊन स्वागत केले.(फोटो कॅप्शन-राजपूत आपली कविता "बैल-पोळा " विद्यार्थ्यांना शिकविताना)
No comments:
Post a Comment