येथील यशवंत कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिराच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त व भगवान श्रीकृष्ण जयंती निमित्त कॉलनीच्या वतीने सदस्यांनी ९ऑगस्ट ते १५ऑगस्ट पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा श्रीकृष्ण मंदिरात आयोजित केली होती.शुक्रवार (ता,१५)रोजी भगवान श्रीकृष्ण जयंती दिनी या कथेचा समारोप होऊन भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत आनंद व उत्साहात संपन्न झाला. भागवत कथाकार हभप उत्तम महाराज गाडे यांच्या अमृतमय वाणी आणि त्यांचे सहकारी यांच्या संगीतमय गोड वाणीतून शहरातील भक्त भाविकांनी भागवत कथा श्रवण केल्या.ठोंबरे परिवाराने यात पुढाकार घेतला.समारोपीय दिनी भाऊसाहेब. पा.ठोंबरे यांनी महाराजांचे पूजन केले.तसेच संजय पा, निकम,सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक ठा.धोंडीरामसिंह राजपूत,बोरसर सरपंच अरुण होले,उत्सव समिती अध्यक्ष डॉ,नितेश शहा, छगनराव दारूटे, अशोक पेहरकर,गुलाबराव पवार , पी.जी.
पवार यांनी ही महाराजांचे पूजन केले.भाऊसाहेब पा, ठोंबरे,सुधाकर ठोंबरे,उल्हास पा, ठोंबरे,उमाकांत ठोंबरे,पंकज ठोंबरे, सौ,संध्याताई ठोंबरे यांनी पुढाकार
घेतला. या प्रसंगी पी .जी.पवार,रामकृष्ण साठे,बबनराव डोंगरे, शशिकांत भालेराव,भाऊसाहेब शिंदे,राजेंद्र जानराव,श्री. वाघचौरे,यांच्या सह ,यशवंत कॉलोनीतिल महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .सायंकाळी हभप उत्तम महाराज गाडे यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.(फोटो कॅप्शन-हभप गाडे महाराज यांचे पूजन करताना भाऊसाहेब काका ठोंबरे व धोंडीराम राजपूत).
No comments:
Post a Comment