वैजापुरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात - Vaijapur News

Breaking

Friday, August 15, 2025

वैजापुरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात

वैजापूर ता,१६
भारतीय स्वातंत्र्यदिन शहर ,परिसर व तालुक्यात सर्व कार्यालये,शैक्षणिक संस्था, बँक इत्यादी कार्यालयात शुक्रवार(ता,१५)रोजी उत्साहात संपन्न झाला.मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी  उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण सम्पन्न झाले.तर तहसील कार्यालयात तहसीलदार सुनिल सावंत,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे,पंचायत समितीत गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर,नगर पालिकेत प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत,हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक विरपत्नी  कमलबाई गणपतराव लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.या प्रसंगी सूत्रसंचलन व आभार  धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात नायब तहसीलदार रामेश्वर महाजन,श्री कुमावत,अभियंता श्री.रोडगे, मुख्याधिकारी भागवत बिघोत,अशोक पवार, श्री दीपक त्रिभुवन,श्रीमती जऱ्हाड,स. पो.नि.विजय देशमुख,यांच्या सह कार्यालय प्रमुख ,कर्मचारीगण,न.प
कार्यालयात डॉ .दिनेश परदेशी, साबेरखान, दशरथ बनकर,मजीद कुरेशी, उल्हास ठोंबरे,डॉ, निलेश भाटिया,सुप्रिया व्यवहारे, डॉ.व्ही.जी.शिंदे,हाजी इम्रान कुरेशी,विशाल संचेती,शैलेश चव्हाण,गौरव दौडे,शैलेश पोंदे,अल्ताफ बाबा,शेख जुबेर बी.बी.जाधव,एम,आर, गणवीर,रवींद्र आप्पा साखरे,पारस पेटारे,महेश शिंदे,रामसिंग गोमलाडू यांच्या सह शहरातील नागरिक  कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment